Monday, January 4, 2016

बीजांडकोश स्त्रीरोगविज्ञान उपदंश , परमा, गोनोरिक , जघन कणार्बुद, लसीका , गुप्तरोग,

प्रसूति एवं स्त्री रोग विशेषज्ञ  | एवं स्त्री रोग विशेषज्ञ In English  | और स्त्री रोग  | रोग के लक्षण  | महिला रोग  | स्त्री रोग प्रश्न  |  में योग चिकित्सा  |  विशेषज्ञ डॉक्टर

Image result for स्त्री रोग विज्ञान
स्त्रीरोगविज्ञान :

स्त्रीच्या जननेंद्रियांचा विकास, क्षमता, रचना-त्मक व कार्यात्मक बदल आणि विकार यांचा अभ्यास स्त्रीरोगविज्ञान या विषयात केला जातो. बाह्य जननेंद्रिये, योनिमार्ग, गर्भाशय, अंडवाहिनी व अंडकोश ( बीजांडकोश ) या भागांचा जननेंद्रियात समावेश होतो. विशेषज्ञ वैद्यकीय व्यावसायिकास या अवयवांखेरीज मूत्राशय, मूत्रवाहिनी, मलाशय व गुदद्वार यांचा आणि स्तनांचाही अभ्यास करणे आवश्यक ठरते. 

पौगंडावस्था ( वयात येणे ), ऋतुचक्राचा प्रारंभ, प्रत्येक ऋतु-चक्रातील निरनिराळ्या अवस्था, गर्भधारणा, प्रसूती व ऋतुनिवृत्ती या प्रसंगी जननेंद्रियात बदल होत असतात. हे बदल व्यवस्थितपणे घडून यावेत आणि त्या काळात स्त्रीला कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टीने स्त्रीरोगतज्ञ उपचार करतात व सल्ला देतात. [ जनन तंत्र].

नैसर्गिकपणे नियमित आणि फारसा त्रास न होता चालणार्‍या जननें-द्रियांच्या कार्यातील दोष अनेक प्रकारचे असू शकतात. त्यांपैकी ऋतु-चक्रातील दोष, वंध्यत्व आणि प्रसूतीशी संबंधित अडचणी यांचा विचार अनुक्रमे ऋतुस्राव व ऋतुविकार , वंध्यत्व आणि प्रसूतिविज्ञान या मराठी विश्वकोशा तील स्वतंत्र नोंदींमध्ये केलेला आहे. 

इतर दोषांची संक्षिप्त माहिती येथे दिली आहे. या सर्व दोषांच्या निदानासाठी स्त्रीच्या ऋतुप्राप्तीपासूनची मासिक पाळीची माहिती, प्रसूतीसंबंधीचा इतिहास, जननेंद्रियांची बाहेरून व आतून तपासणी या गोष्टी नित्याच्या असतात. 

याशिवाय आवश्यकतेनुसार योनिमार्गात घालण्याच्या उपकरणाने अंतर्दर्शन, श्राव्यातीत प्रतिमादर्शन, क्ष-किरण चित्रण, अंतर्दर्शक ( दुर्बिण ) वापरून उदरगुहेचे निरीक्षण, गर्भाशयाचे निरीक्षण, ऊतकाचा नमुना ( गर्भशय्येचा म्हणजेच गर्भाशयाच्या आतील अस्तराचा नमुना ) घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शन, रक्तातील अंतःस्रावाचे मापन यांसारख्या चाचण्या केल्या जातात.

चनेतील उपजत दोष :

भ्रूणात दहाव्या ते बाराव्या आठवड्यांत आढळणार्‍या मुलेरियन वाहिनीद्वयांपासून जननेंद्रियांची निर्मिती होत असते हे दोन कोशिकासमुदाय ( डावा व उजवा ) एकत्र येऊन आणि त्यात पोकळी निर्माण होऊन योनिमार्गाचा वरचा तीनचतुर्थांश भाग, गर्भाशयाची ग्रीवा, गर्भाशय व दोन अंडवाहिन्या अशी खालून वर निर्मिती घडते. या प्रक्रियेतील विलंबामुळे जन्माच्या वेळी काही दोष आढळतात

उदा., अल्पविकसित स्थितीमुळे प्रौढ स्त्रीमध्ये सर्व जननेंद्रिये बाल्यावस्थेतील किंवा पौगंडावस्थेतील आकाराचीच राहून गर्भाशय पुढे झुकलेला असणे किंवा मुलेरियन वाहिनीत पोकळी निर्माण न झाल्यामुळे जननमार्ग एखाद्या रज्जूसारखा भरीव असणे किंवा हीच अच्छिद्रतेची स्थिती ( संकोचता ) अंडवाहिनीपुरती मर्यादित राहिल्याने वंध्यत्व असणे. 

कधीकधी योनि-मुखावरील जाड पडद्याचे आवरण टिकून राहून त्यामुळे तो मार्ग बंद राहतो आणि ऋतुस्रावातील रक्त व इतर ऊतक बाहेर न पडता साचू लागते. योनिमार्ग व गर्भाशय फुगून अस्वस्थता जाणवते.

मुलेरियन वाहिनी एकमेकींशी जोडण्याची क्रिया अपूर्ण राहिल्यास त्यांची स्वतंत्रपणे वाढ होऊ शकते. परिणामतः दोन गर्भाशय निर्माण होतात किंवा एकाच गर्भाशयात उभा पडदा होऊन त्याचे दोन भाग पडतात. असा पडदा पूर्ण किंवा वरच्या भागापुरता मर्यादित असतो. यांपैकी एका गर्भाशयात गर्भधारणा होऊ शकते. 

 जननेंद्रिये पूर्णपणे अविकसित राहण्याची स्थिती क्वचितच उद्भवते. तशी असल्यास त्यासोबत मूत्र-मार्गाचेही दोष आढळतात. योनिमार्गाचा सर्वात खालचा भाग आणि गुदद्वार यांच्या विकासात अडथळा आल्यास कधीकधी मलाशयाची जोडणी योनिमार्गाशी होऊन गुदद्वार मात्र छिद्रहीन राहते.

संपूर्ण अविकसित जननेंद्रियाचा अपवाद सोडल्यास बाकी सर्व उपजत दोष शस्त्रक्रियेने बरे होऊ शकतात.


Image result for स्त्री रोग विज्ञान




संक्रामणजन्य विकार :

 स्त्रीच्या जनन तंत्राची अनेक संक्रामणे लैंगिक संबंधांतून उद्भवलेली असतात. उपदंश ( गरमी ) आणि परमा ( गोनोरिक ) या दोन संक्रामणांचे प्रमाण प्रतिजैविके, आरोग्य-विषयक शिक्षण व कंडोमचा वापर यांमुळे गेल्या ५० वर्षांत खूप कमी झाले आहे. 

अन्यथा उपदंशामुळे योनिमार्गावर लाल कठीण फोड येणे ( रतिव्रण ), साधारण चार आठवड्यांनी लहानलहान पीटिका दिसणे, मातेपासून नवजात बालकास उपजत विकारामुळे त्याची वाढ खुंटणे इ. समस्या निर्माण होत असत. 

परमा संक्रामणामुळे ग्रीवा, बार्थोलिन ग्रंथी, मूत्रमार्ग यांचा दाह, विद्रधी, पू निर्माण होऊन मूत्रात तो आढळणे, वंध्यत्व, नवजात अर्भकात डोळ्यांमधील संक्रामण अशा तक्रारी असत. या दोन्ही रोगांची काही वर्षांनी आढळणारी सार्वदेहिक लक्षणेही आता फारशी आढळत नाहीत.

लैंगिक संबंधातून होणार्‍या इतर संक्रामणांमध्ये जघन कणार्बुद, लसीका कणार्बुदी वंक्षण रोग व मृदु रतिव्रण या तीन प्रकारांचा समावेश होतो. पहिला प्रकार क्लोबसिएल्ला वर्गातील जंतूंमुळे होतो. जांघेमध्ये मोठी गाठ येऊन तिचे रूपांतर विद्रधीमध्ये होते. दुसर्‍या प्रकारास कोशिकांतर्गत वाढणारे क्लॅमिडीया वर्गाचे लहान जंतू कारणीभूत असतात. 

बाह्य जननेंद्रियांवर फोड किंवा विद्रधी निर्माण होऊन त्यामुळे जांघेतील अनेक लसीका ग्रंथी खोलवरच्या तसेच त्वचेखालील - सुजून वेदना-दायक होतात. त्या फुटून व्रणही होण्याची शक्यता असते. आसपासच्या भागात संक्रामण पसरू शकते. तिसर्‍या प्रकारात हीमोफायलस दुक्रेयी सूक्ष्मजंतू मृदू आणि वेदनादायक विद्रधी निर्माण करतात. बाह्य जननेंद्रियावर ते आढळतात. [ गुप्तरोग].

विषाणुजन्य विकारातील एचआयव्ही ( HIV ) विषाणूंमुळे एड्स लैंगिक संबंधातून होत असला तरी त्याची जननेंद्रियात लक्षणे आढळतनाहीत [ रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग ]. इतर लक्षणेही फार उशिरा दिसतात. रक्ताच्या परीक्षणातूनच त्याचे निदान होऊ शकते. परिसर्पचा सामान्य प्रकार लैंगिक संबंधातून जननेंद्रियांवर आक्रमण करण्याची शक्यता असली तरी इतरत्र प्राथमिक संक्रामणही होऊ शकते. 


चामखीळ निर्माण करणारा विषाणू लैंगिक संबंधातून स्त्रीच्या जनन-मार्गात प्रवेश करू शकतो. या विषाणूच्या संक्रामणानंतर काही काळाने जननेंद्रियावर बारीक फोड निर्माण होऊ शकतात. कधीकधी हे संक्रामण पूर्णपणे लक्षणविरहित असू शकते; परंतु त्याचा संबंध नंतर निर्माण होणार्‍या ग्रीवेच्या कर्करोगाशी असू शकतो. यासाठी वयात आलेल्या सर्व स्त्रियांना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम आता काही देशांमध्ये राबविली जात आहे.

हस्तमैथुन ,मुष्टिमैथुन,स्वतःच हाताने आपल्या जननेंद्रियाचे उद्दीपन व मर्दन करून लैंगिक समाधान व समागमाचे सुख ...,

हस्तमैथुन ,मुष्टिमैथुन,स्वतःच हाताने आपल्या जननेंद्रियाचे उद्दीपन व मर्दन करून लैंगिक समाधान व समागमाचे सुख ..., 

हस्तमैथुन : (मुष्टिमैथुन ). स्वतःच हाताने आपल्या जननेंद्रियाचे उद्दीपन व मर्दन करून लैंगिक समाधान व समागमाचे सुख (रतिसुख) मिळविण्याच्या क्रियेला हस्तमैथुन म्हणतात. पौगंडावस्थेतील व्यक्ती व अविवाहित (एकटी) प्रौढ व्यक्ती यांच्यात हस्तमैथुन ही सर्वांत सामान्यपणे आढळणारी लैंगिक क्रिया आहे. 

अ‍ॅल्फ्रेड किन्सी व इतरांनी विसाव्या शतकाच्या मध्यात केलेल्या अभ्यासांवरून अमेरिकेतील लोकांविषयीची पुढील आकडेवारी समोर आली आहे. व्यक्ती वीसवर्षांची होईपर्यंत ९० टक्क्यांहून अधिक पुरुषांनी आणि ३० टक्क्यांहून अधिक स्त्रियांनी हस्तमैथुन केलेले असते. 

चाळीसाव्या वर्षांपर्यंत ९५ टक्क्यांहून अधिक पुरुषांनी व ८० टक्क्यांहून अधिक स्त्रियांनी आयुष्यात कधीतरी हस्तमैथुन केलेले असते. यूरोपमध्ये झालेल्या अशा प्रकारच्या अध्ययनांतूनही यासारखी आकडेवारी समोर आली आहे.
Image result for हस्तमैथुन

व्यक्तीचे वय व वैवाहिक स्थिती यांनुसार हस्तमैथुन करण्याची वारंवारता वेगवेगळी असते. पौगंडावस्थेतील बहुतेक व्यक्ती आठवड्यात सरासरी दोन किंवा तीन वेळा हस्तमैथुन करतात. विवाहित व्यक्तींमध्ये सर्व-साधारणपणे महिन्यातून एकदा हस्तमैथुन करण्याची प्रवृत्ती आढळते. 

चाळीस ते पन्नास वर्षांचे एकेकटे पुरुष अथवा स्त्रिया आठवड्यातून सरासरी एकदा व याहून अधिक तरुण असलेल्या एकेकट्या व्यक्ती आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हस्तमैथुन करतात.

हस्तमैथुन करण्याची वेगवेगळी तंत्रे आहेत. बहुतेक पुरुष शिश्‍नाचा अग्रभाग व त्यापुढील पूर्ण भाग यांचे स्वतःच्या हाताने लयबद्ध रीतीने मर्दन करतात. इतर काही पुरुष आपले शिश्‍न उशीवर घासतात. क्वचित शिश्‍नाचे मर्दन लैंगिक जोडीदाराकडून करवून घेतले जाते. 

यात समागमाचा हेतू नसतो. बहुतेक स्त्रिया योनिलिंगाचे (क्लिटॉरिसचे म्हणजे भगाच्याविटपाच्या वरच्या अग्र भागातील लहान अवयवाचे) हाताने उद्दीपन करून व लैंगिक भावना चेतवून हस्तमैथुन करतात. 
Image result for हस्तमैथुन
काही स्त्रिया योनीत बोट वा मेणबत्तीसारखे साधन घालून असे उद्दीपन करतात, तर काही स्त्रिया यासाठी स्वतःच्या दोन मांड्या एकमेकींवर लयबद्ध रीतीने घासतात. लैंगिक उद्दीपनासाठी पुरुष व स्त्रिया कंपनकासारख्या यांत्रिक प्रयुक्त्या, रबरी शिश्‍न किंवा रबरी स्त्री योनी यांसारख्या गोष्टी वापरतात.

व्यक्ती हस्तमैथुनाकडे कशी पाहते, यावर त्याचा मानसशास्त्रीय अर्थ अवलंबून असतो. काहींमध्ये यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होते. काहींना हा ताणमुक्तीचा सोपा उपाय वाटतो व यात भावनेला थारानसतो. काहींच्या मते ही एक केवळ मजा असून ती आनंदासाठी करायची कृती आहे. अशा प्रकारे हस्तमैथुनाचा संबंध बहुधा उत्सुकता, मनातील कल्पनाजाल किंवा आनंदासाठी करायची गोष्ट यांच्याशी येतो.

Image result for हस्तमैथुन

हस्तमैथुनामुळे कोणत्या तरी प्रकारचा शारीरिक वा मानसिक आजार होतो, या पूर्वग्रहाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हस्तमैथुनामुळे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, म्हणजे ते हानीकारक वाअपायकारक नाही. शिश्‍न ताठ होणे, ते चोळले जाणे व शेवटी वीर्यपतन होणे या घटना संभोग व हस्तमैथुन या दोन्ही क्रियांत एकसारख्याच असतात, म्हणून संभोगाप्रमाणेच हस्तमैथुन अपायकारक नाही. 

हस्त-मैथुनामुळे वीर्यनाश होतो आणि वीर्यनाश म्हणजे शक्तिनाश हा बालीशसमज आहे. कारण वीर्य लाळेप्रमाणे शरीरातील तीन ग्रंथींमधून होणाऱ्या स्रावांचे मिश्रण असलेले सामान्य द्रव्य आहे. त्यातील शुक्राणू प्रजननासाठी गरजेचे असून त्याचा शरीराला काही उपयोग होत नाही; तथापि, डोकेदुखी, थकवा, हृदयविकार, अपस्मार किंवा बुद्धिभ्रंश (वेड) अशा विविध आजारांचे कारण हस्तमैथुन मानून वैद्यकीय मंडळी पूर्वी त्याची निर्भत्सना करीत असत. 

मात्र, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असे प्रयोगांतून उघड झाले आहे. प्रौढावस्थेतील एकट्या व्यक्तींचे हस्तमैथुन ही अगदी सामान्य बाब आहे. मात्र, जोडीदार असतानाही समागमाला पर्याय म्हणून हस्तमैथुन करणे किंवा हस्तमैथुनाचा अतिरेक हे मानसिक समस्येचे लक्षण असू शकते.

मुलांमध्येही हस्तमैथुन आढळते. ते त्याला शिकवावे लागत नाही. वयाच्या १३१८ वर्षांच्या दरम्यान मुलगा स्वतःहून ते शोधून काढतो.मात्र, लोकांना तापदायक ठरून राग आणणारे मुलांकडून उघडपणे होणारे हस्तमैथुन ही मानसिक समस्या मानतात
Image result for हस्तमैथुन

म्हणून स्वतःच्या जननेंद्रियाला स्पर्श करणे ही खाजगी गोष्ट असून ती जाहीरपणे करणे चुकीचे आहे, हे मुलांना समजावून सांगणे गरजेचे असते. मात्र, यासाठी शिक्षा करणेकिंवा भीती दाखविणे यांमुळे मुलांमध्ये मानसिक समस्या उद्भवूशकतात आणि पुढील आयुष्यात त्या लैंगिक गैरकृत्य या स्वरूपात समोरयेऊ शकतात.

बहुतेक धर्मांत हस्तमैथुन निषिद्ध मानले आहे. ख्रिश्चन व ज्यू धर्मांत हस्तमैथुनाला मनाई आहे. जुन्या करारातील सृष्टीच्या उत्पत्तीविषयीचे वर्णन असलेल्या जेनेसिसया पहिल्या पुस्तकातील पुढील कथनावर ही मनाई आधारलेली आहे. 

या माहितीनुसार ओनान नावाच्या जुडाहच्या पुत्राने समागम पूर्ण करण्याऐवजी आपले वीर्य पृथ्वीवर सांडले, यामुळे त्याची निर्भत्सना करण्यात आली [बायबल]. तसेच रोमन कॅथलिक चर्च हस्तमैथुन हे नैतिक पाप मानते व त्याची निर्भत्सना करते.Image result for हस्तमैथुन


अशा धार्मिक वृत्तीच्या लोकांमध्ये ज्यांचे संगोपन झालेले असते, अशा लोकांचा त्यांच्या शारीरिक (लैंगिक) गरजांशी मानसिक संघर्ष निर्माण होतो आणि त्यांच्या मनात हस्तमैथुनाबाबत लज्जा व अपराधीपणाची भावना निर्माण होते; तथापि, लैंगिक शिक्षणात होणारी वाढ व एकूणच लैंगिकतेविषयी वाढत असलेला मोकळेपणा यांच्यापुढे हस्त-मैथुनाविषयीची अपराधीपणाची सल व शरम कमी होत आहे. शिवाय त्याचे अभ्यासक हस्तमैथुन या लैंगिक वर्तनाच्या आरोग्यदायी, समाधान देणारे, ताण हलका करणारे, शामक इ. गुणांची स्तुती करू लागले आहेत.

अमेरिकेत हस्तमैथुनप्रतिबंधक कायदा नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणे, हे असभ्य व निंद्य कृत्य मानले जाते.

पहा : लैंगिक वर्तन; लैंगिक शिक्षण.

घटस्फोट विवाह रद्द करणे, न्यायिक पृथकता व घटस्फोट

घटस्फोट : बहुकेत जुन्या पाश्चिमात्य समाजात विवाह हा सामाजिक करार समजण्यात येई. शासनाचा त्याच्याशी संबंध नसे. ज्यूंचे धार्मिक सरकार मात्र विवाहासकट सर्व सामाजिक गोष्टींवर नियंत्रण ठेवीत असे. प्राचीन ग्रीक समाजात पती स्त्रीधन परत करून पत्नीला तिच्या बापाकडे पाठवून घटस्फोट घेऊ शकत असे. व्यभिचाराच्या कारणावरून पतीला घटस्फोट घेता येत असे; पण पत्नीला मात्र याच कारणावरून घटस्फोट घेता येत नसे. अथेनियन कायद्याप्रमाणे पति-पत्नी दोघेही घटस्फोट घेऊ शकत असले, तरी पती घटस्फोट घेण्यास अधिक स्वतंत्र होता. दोघांच्या संमतीने घटस्फोट मिळण्याची सोय ही आधुनिकता ध्वनित करणारी त्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण तरतूद होती. प्राचीन रोमन लोकांतही घटस्फोट मान्य होता. स्त्री-पुरुष दोघांनाही घटस्फोट घेण्यास कायद्याने मुभा होती. विवाह बंधनातून मुक्त केल्याचे साध्या पत्राने पतीने किंवा पत्नीने कळविणे पुरेसे होते. याचा अधिक फायदा श्रीमंत पुरुषांना मिळू लागला. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागले व त्याचा फायदा विशिष्ट वर्गालाच मिळू लागला. परिणामतः ऑगस्टस सीझरने स्वतःच्या कारकीर्दीत (इ. स. पू. ३० ते इ. स. १४) घटस्फोटावर मर्यादा घालणारे कायदे संमत केले, त्यांपैकी ज्यूलियन लॉज हे महत्त्वाचे समजण्यात येतात. रोमच्या इतिहासात विवाह व घटस्फोट हे पहिल्यांदाच शासनाच्या कक्षेत आणण्यात आले. खिस्ती धर्माच्या उदयानंतर स्त्रीच्या स्वातंत्र्यावर आणखीनच मर्यादा पडल्या. त्यामुळे घटस्फोटाच्या स्त्रीच्या हक्कावरही बंधन आले. सोळाव्या शतकात प्रॉटेस्टंट पंथ उदयाला आल्यानंतर नवऱ्याची क्रूरता आदी काही कारणांकरिता स्त्रीस घटस्फोट घेता येऊ लागला. १६८७ साली नॉर्वेत, १७३४ साली स्वीडनमध्ये व प्रशियात आणि १७९२ साली फ्रान्समध्ये व बेल्जियममध्ये घटस्फोटास मान्यता मिळाली. फ्रान्सने १८१६ साली पुन्हा घटस्फोटावर बंदी घातली; परंतु १८८४ साली पुन्हा घटस्फोटाचा कायदा लागू केला. धर्मसुधारणावादी चळवळीनंतर पुष्कळशा प्रॉटेस्टंट देशांनी घटस्फोटास मान्यता दिली. नेदर्लंड्स, डेन्मार्क व स्कॉटलंड या देशांत हा बदल एकाच वेळी घडून आला. हे देश १५६० पासून व्यभिचार वा परित्याग या कारणांकरिता घटस्फोट देत असत. इंग्लंडमध्ये १८५७ च्या मॅट्रिमोनिअल कॉजेस ॲक्टने घटस्फोटास चालना मिळाली.

 घटस्फोट म्हणजे पति-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीर रीत्या तोडणे. मूलतः विवाह रद्द करणे व घटस्फोट घेणे यात फरक करावयास पाहिजे. मूळ विवाह रद्द करण्यात विवाहच मुळी वैध झालेला नसतो. असा विवाह रद्द करण्याकरिता पक्षकाराने न्यायालयाकडेच दाद मागावयास पाहिजे, असे नाही. त्याचप्रमाणे न्यायिक पृथक्‌ता व घटस्फोट यांमधील फरक घटस्फोटाची कायदेशीर व्याप्ती समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. न्यायिक पृथक्‌ता हे घटस्फोटाकरिता एक कारण होऊ शकते. न्यायिक पृथक्‌तेच्या हुकूमनाम्याने वैवाहिक वैध संबंध फक्त निलंबित होतात; कायमचे संपुष्टात येत नाहीत. न्यायालयाचा हुकूमनामा घेऊन ते पूर्ववत करता येतात किंवा कायमचे तोडता येतात. घटस्फोटाचा हुकूमनामा वैवाहिक संबंध कायमचे संपुष्टात आणणारा असतो. घटस्फोटाने जसे वैवाहिक संबंध पूर्णपणे व कायमचे तोडता येतात, तसे न्यायिक पृथक्‌तेने होत नाही. मूलतः विवाह रद्द करणे, न्यायिक पृथकता व घटस्फोट या तिन्हींची कायद्यात नमूद केलेली कारणेही भिन्न भिन्न आहेत.



हिंदू धर्मशास्त्रात विवाह हा एक महत्त्वाचा धार्मिक संस्कार मानण्यात आला आहे. या संस्काराने निर्माण झालेले बंधन अखंड असते, जन्मोजन्मी ते टिकते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. धर्मग्रंथही सामान्यतः असेच प्रतिपादन करतात; पण पुरुषांनी विवाहाची बंधने अनेक वेळा झुगारून दिलेली आहेत. स्त्रीने पतीचा त्याग करणे किंवा पुनर्विवाह करणे हे मात्र महापाप समजण्यात येई. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात व नंतरच्या काळातही घटस्फोटाला विरोधच दिसून येतो. त्या काळातील धर्मग्रंथांतही त्याचे प्रतिबिंब दिसते. इसवी सनापूर्वी एक दोन शतके किंवा त्या सुमारास काही विशिष्ट प्रसंगी विवाहविच्छेद मान्य असावा, असे दिसते. प्राचीन वेदादी ग्रंथांत घटस्फोटाचा उल्लेख सापडत नाही; पण बौद्ध वाङ्‌मयात मात्र थोड्याबहुत प्रमाणात तो आढळतो. मनू, पाराशर इत्यादींची काही वचने विशिष्ट परिस्थितीत विवाहविच्छेदन योग्य असल्याचे दर्शवितात. पति-पत्नीचे काही कारणाने एकत्र राहणे कठीण झाले, तर घटस्फोट घ्यावा असे कौटिल्य सांगतो; पण ही मुभा विशिष्ट विवाहप्रकारापुरतीच (आसुर, गांधर्व, पैशाच) मर्यादित आहे. खालच्या जातीत जरी हे विवाहप्रकार असले, तरी ब्राह्मण किंवा इतर वरिष्ठ जाती त्यांपासून अलिप्त होत्याच असे नाही. यावरून कमीअधिक प्रमाणात सर्व थरांत विशिष्ट परिस्थितीत घटस्फोट रूढ होता, असे अनुमान काढण्यास वाव आहे; पण त्याचा फायदा बव्हंशी पुरुषांना मिळत असे.

शिकारी व पशूंचे कळप घेऊन हिंडणाऱ्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढते होते; पण जसजसा समाज शेतीप्रधान होत गेला व कुटुंबावर पित्याची सत्ता जसजशी प्रस्थापित होऊन पितृसत्ताक कुटुंबाची कल्पना रूढ होत गेली, तसतसे घटस्फोटाचे प्रमाण कमी होत गेलेले दिसते. विशेषतः जमीन अखंड ठेवण्याच्या गरजेमुळे आणि स्त्रीला शेतकामात महत्त्व प्राप्त होत गेल्यामुळे स्त्रियांना घटस्फोट मिळणे कठीण होऊ लागले. हिंदू, ग्रीक, रोमन, ज्यू, चिनी यांसारख्या सर्व प्राचीन समाजांत ही गोष्ट दिसून येते. या संस्कृतींचा आर्थिक पाया शेतीचा होता व कुटुंबरचना पितृप्रधान होती. साहजिक या दोहोंचे प्रतिबिंब या समाजांतील घटस्फोटांच्या नियमांत पडलेले दिसून येते. पुरुषाचा घटस्फोटाचा हक्क अबाधित होता. त्याच्या स्त्रीवरील अनियंत्रित अधिकाराचे ते प्रतीकच होते. असे असले, तरी पुरुषांचे नपुंसकत्व, व्यंग, दुर्धर रोग, पत्नीचा दीर्घ काळ त्याग, दीर्घ काळ घरातील अनुपस्थिती किंवा उपेक्षा अशा अपवादात्मक परिस्थितीत स्त्रियांना घटस्फोटाची मुभा बहुतेक सर्व प्राचीन समाजांत होती. प्राचीन संस्कृतीत वर्गीय भेद महत्त्वाचे असल्यामुळे घटस्फोटाचे वरील चित्र मुख्यतः धनिक आणि वरच्या वर्गाचे आहे. खालच्या वर्गात घटस्फोटाबाबतची बंधने सापेक्षतः सैल होती.

निष्ठ जमातीत त्याचप्रमाणे विभिन्न प्रांतांत रूढीच्या नावाखाली घटस्फोट घेतला जाऊ शके. आजही ही प्रथा बंद झालेली नाही. पाश्चिमात्यांत व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेमुळे घटस्फोटासंबंधीचे कायदे भारतापेक्षा लवकर अस्तित्वात आले. भारतात यासंबंधीचा पहिला कायदा पारशी मॅरेज अँड डायव्होर्स ॲक्ट १८६५ साली अस्तित्वात आला. त्याच्या नंतर ख्रिश्चनांकरिता इंडियन डायव्होर्स ॲक्ट १८६९ अस्तित्वात आला. द डिस्सोल्यूशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट १९३९ साली संमत झाला. १९४७ साली त्या वेळच्या मुंबई प्रांतात सरकारने घटस्फोटाचा कायदा संमत केला. असे असले, तरी सर्व प्रांतांना व सर्व थरांतील हिंदू लोकांना व जमातींना लागू होणारा एक कायदा १९५४ पर्यंत अस्तित्वात नव्हता. १९५४ साली अशा प्रकारचा स्पेशल मॅरेज ॲक्ट अस्तित्वात आला व तो देशभर लागू करण्यात आला. त्यानुसार धर्म, जाती, पंथ इ. बाबींचा विवाहाच्या बाबतीत अडसर राहिला नाही. या अधिनियमाच्या अंतर्गत विवाह करणाऱ्यांकरिता जरूर पडल्यास घटस्फोटासंबंधी कायद्यातील तरतुदी हिंदू विवाह अधिनियमाच्या (१९५५) तेराव्या कलमात सांगितल्या आहेत. पतिपत्नीला या कलमात सांगितलेल्या कोणत्याही कारणाकरिता परस्परांपासून घटस्फोट मागता येतो. व्यभिचारी असणे, धर्मांतर करून हिंदु धर्म सोडणे, अर्जाच्या लगत पूर्वी कमीत कमी तीन वर्षेपर्यंत दुरुस्त न होणारे वेड असणे किंवा गुप्तरोग व बरा न होणारा महारोग असणे किंवा संसर्गजन्य गुप्तरोग असणे, संन्यास घेणे, कमीतकमी सात वर्षापर्यंत बेपत्ता असणे, न्यायिक पृथक्‌पणानंतर दोन वर्षे किंवा अधिक दांपत्यभावाने सहवास न करणे, दांपत्य अधिकारांच्या प्रत्यास्थापनाचा हुकूमनामा झाल्यानंतर दोन किंवा अधिक वर्षे तशी प्रत्यास्थापना न करणे यांपैकी कोणतेही कारण घटस्फोट मिळविण्यास पुरेसे आहे. याव्यतिरिक्त स्त्री आणखी दोन कारणांकरिता घटस्फोट घेऊ शकते : (१) हा अधिनियम अंमलात येण्यापूर्वी किंवा नंतर पतीने दुसरे लग्न केलेले असणे व ती पत्नी जिवंत असणे. (२) पती जबरी संभोग, अनैसर्गिक संबंध किंवा पशुसंबंध यांबद्दल दोषी असणे.

सायण व काही पश्चिमी पंडीत पाऊस अडविणारा दानव म्हणजे वृत्र होय

इंद्र : वैदिक देवताविद्येत इंद्राला मुख्य स्थान आहे. वैदिक भारतीयांचा इंद्र हा सर्वश्रेष्ठ व प्रमुख असा राष्ट्रीय देव आहे. जवळजवळ एक चतुर्थांश ऋग्वेद इंद्राला वाहिलेला आहे. इंद्र हा युद्धदेव आहे. ऋग्वेदकाळी भारतीय निरंतर संग्रामस्थ होते. इंद्र अश्वरथात बसून त्यांना युद्धात विजयी करी. तो स्वतः विश्वातील राक्षसी शक्तींशी नरंतर युद्ध करून त्या शक्तींचा निःपात करतो. त्याच्या अतुलनीय सामर्थ्याची, युद्धातील यशस्वी कर्तृत्वाची वर्णने ऋग्वेदातील ऋषी वारंवार करतात. तो आपल्या भयंकर वज्राने व धनुष्यबाणांनी लढाई करून दस्यूदानवांचा विध्वंस करतो. विशेषतः त्याचा मुख्य शत्रू वृत्र होय. वृत्रनाशाच्या पराक्रमावर रचलेली पुष्कळ सूक्ते ऋग्वेदात. वृत्र हा दानव जलप्रवाह अडवतो आणि अनावृष्टी व दुर्भिक्ष्य निर्माण करतो.

इंद्राचे बाहू बलशाली आणि अत्यंत लांबलचक आहेत. अनंत विस्तार असलेला द्यूलोक आणि प्रचंड पृथ्वी ही त्याच्या एका मुठीत मावतात
वज्रधारी इंद्र : दक्षिण भारतातील एका लाकडी मूर्तीवरून केलेले रेखाटन.वज्रधारी इंद्र : दक्षिण भारतातील एका लाकडी मूर्तीवरून केलेले रेखाटन.
 (ऋग्वेद १.८०.८; ४.२१.९; ६.१९.३). त्याचे केस व दाढी सोनेरी आहे आणि शरीराचा रंगही सोनेरी-गोरा आहे. त्याचे शरीर द्यूलोक आणि पृथ्वी ही पासंगालाही पुरणार नाहीत, एवढे मोठे आहे. सोमपानाच्या योगाने आणि स्तोत्रमंत्रांनी त्याचे सामर्थ्य- अत्यंत भरतीस येते. चार किंवा तीस तळी भरतील इतका सोमरस पिऊन तो पचवितो. इंद्राने कधी एका बैलाचे, कधी वीस बैलांचे तर कधी शंभर रेड्यांचे मांस पचविले आहे (ऋग्वेद १०.२७, २८, ८६; ६.१७). त्याची 'पुरभिद्', 'वृत्रहन्' आणि 'मघवन्' अशी विशेषणे वारंवार येतात. मरुद्‌गण हे त्याचे युद्धातले सहकारी होत. दानवशत्रूंची वसती असलेली दगडांची धातूंची नव्वद किंवा नव्व्याण्णव किंवा शंभर पुरे त्याने फोडून टाकली, म्हणून त्यास 'पुरभिद्' म्हणतात. सर्प असलेला वृत्र हा त्याचा शत्रू. हा शत्रू पर्वतात वसती करून नद्यांचे प्रवाह स्वतःच्या अंगाने अडवतो. इंद्र वृत्राला अशा स्थितीत वज्राने जर्जर करून मारतो व अडवलेले जलप्रवाह मोकळे करतो (ऋग्वेद ८.६.६); म्हणून त्यास 'वृत्रहन्' म्हणतात. भक्तांना युद्धात विजय मिळवून देऊन 'मघ' म्हणजे वैभव देतो; म्हणून त्याला वैभवशाली म्हणजे 'मघवन्' असे विशेषण लावले आहे.

सायण व काही पश्चिमी पंडीत पाऊस अडविणारा दानव म्हणजे वृत्र होय, असा अर्थ करतात. तो पर्वतात राहतो याचा अर्थ तो पर्वतासारख्या मेघांमध्ये राहतो, असा केला आहे. अफगाणिस्तानपासून काश्मीरपर्यंतच्या हिमालयीन प्रदेशात आर्य राहू लागले, त्यावेळच्या तेथील बर्फमय प्रदेशातील परिस्थितीत उपासिलेला इंद्र हा देव होय असे मानले, तर इंद्र-वृत्र युद्धाची वर्णने अधिक समर्पक ठरतात, असे काहींचे मत आहे. शीतकाळी पाण्याचे प्रवाह गोठतात. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. हा शीतकाळ संपू लागला म्हणजे बर्फ वितळू लागतो. पर्वतातील बर्फ व हिमनद्या वितळविणारा सूर्य म्हणजेच इंद्र होय आणि शीतकाळ हा वृत्र होय, अशी उपपत्ती अधिक योग्य दिसते.

इंद्र ही देवता वेदपूर्वकालीन आर्यांमध्येही पूजनीय होती. बोगाझकई येथे सापडलेल्या इ. स. पू. चौदाव्या शतकातील दोन आर्य राजांत झालेल्या शांततेच्या तहनाम्यात उल्लेखिलेल्या देवतांमध्ये वरूण, मित्र, नासत्य यांच्याबरोबर इंद्राचाही निर्देश आहे. अवेस्तामध्ये दुष्ट देव म्हणून इंद्र उल्लेखिलेला आहे. 'वृत्रहन्' या विशेषणाच्याऐवजी त्याच अर्था 'वृत्रघ्‍न' (वेरेथ्रघ्‍न) हे नाव असलेली निराळी देवता अवेस्तात सांगितली आहे. आर्य भारतात आल्यानंतर आर्यांच्या युद्धव्यवसायामुळे इंद्राचे माहात्म्य वाढले, असे म्हणता येईल.

ब्राह्मणग्रंथांत यज्ञांचे महत्त्व देवतांच्यापेक्षाही अधिक वाढले व देव यज्ञांग म्हणून दुय्यम ठरले, त्याबरोबरच इंद्राचेही महत्त्व कमी झाले. इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येची कथा ब्राह्मणग्रंथांत आली आहे. देवत्वष्टा याचा पुत्र विश्वरूप हा ब्राह्मण होता. त्याची हत्या इंद्राने केली; त्या ब्रह्महत्येच्या पातकातून सुटका होण्याकरता इंद्राने भूमी, जल, वृक्ष व स्त्रिया यांच्यामध्ये ते पातक वाटून दिले (भागवत ६.९; स्कंदपु. माहेश्वर १.१५; लिंगपु. २.५१).

पुराणग्रंथांमध्ये इंद्राचे माहात्म्य पुष्कळच घटले. विष्णू वा शिव या देवांचा देवाधिदेव म्हणून महिमा स्थापित झाला. ऋग्वेदामध्ये इंद्र हा द्यावा-पृथ्वीचा पुत्र किंवा त्वष्ट्याचा पुत्र म्हणून विर्दिष्ट केला आहे. परंतु इंद्र हा पुराणांप्रमाणे कश्यप व अदिती यांचा पुत्र होय. पुराणांप्रमाणे त्वष्ट्याने पुत्रनाशाच्या दुःखाने संत्रस्त होऊन इंद्राला मारणारा पुत्र होण्यासाठी यज्ञ केला. त्यात 'इन्द्रशत्रुर्वधस्व स्वाहा' असा मंत्र म्हणताना चुकीचा स्वरोच्चार केला. 'इन्द्रशत्रु' या सामासिक पदाचा स्वरभेद झाल्यामुळे तत्पुरुष समास म्हणजे 'इंद्राचा शत्रू' म्हणजे 'इंद्राचे हनन करणारा' असा होण्याच्या ऐवजी बहुव्रीही समास होऊन 'इंद्र ज्याचे हनन करतो तो' असा अर्थ झाला. इंद्राला वध्य असलेला वृत्र त्यामुळे उत्पन्न झाला. वृत्राच्या वधासाठी दधीची ऋषीच्या अस्थी मिळवून त्याची आयुधे तयार केली व त्यांच्या योगाने वृत्राला मारले. इंद्राला सहस्रनेत्र आहेत. त्याचा पुरोहित बृहस्पती, पत्‍नी इंद्राणी व पुत्र जयंत, ऋषभ व मीढ्‌वान हे होत. त्याचा अश्व-उच्चैःश्रवा, गज-ऐरावत, नगरी-अमरावती, उद्यान-नंदनवन व पेय-सोमरस होय. पुराणातील इंद्राची दुसरी प्रसिद्ध कथा इंद्र व अहल्या यांच्या संबंधाची होय. अहल्या ही गौतम ऋषीची पत्‍नी. गौतम ऋषीच्या आश्रमात, गौतम ऋषी गैरहजर असताना, इंद्राने गौतमाचे रूप घेऊन प्रवेश केला व तिचा संभोग घेतला. गौतमाने इंद्राला व अहल्येला शाप दिला. त्यामुळे इंद्राचे सहस्रनेत्र नष्ट होऊन त्याला त्या ठिकाणी सहस्र भगे म्हणजे छिद्रे पडली आणि अहल्या शिळा होऊन पडली (ब्रह्मपु. ८७, १२२).