Showing posts with label गोनोरिक. Show all posts
Showing posts with label गोनोरिक. Show all posts

Monday, January 4, 2016

बीजांडकोश स्त्रीरोगविज्ञान उपदंश , परमा, गोनोरिक , जघन कणार्बुद, लसीका , गुप्तरोग,

प्रसूति एवं स्त्री रोग विशेषज्ञ  | एवं स्त्री रोग विशेषज्ञ In English  | और स्त्री रोग  | रोग के लक्षण  | महिला रोग  | स्त्री रोग प्रश्न  |  में योग चिकित्सा  |  विशेषज्ञ डॉक्टर

Image result for स्त्री रोग विज्ञान
स्त्रीरोगविज्ञान :

स्त्रीच्या जननेंद्रियांचा विकास, क्षमता, रचना-त्मक व कार्यात्मक बदल आणि विकार यांचा अभ्यास स्त्रीरोगविज्ञान या विषयात केला जातो. बाह्य जननेंद्रिये, योनिमार्ग, गर्भाशय, अंडवाहिनी व अंडकोश ( बीजांडकोश ) या भागांचा जननेंद्रियात समावेश होतो. विशेषज्ञ वैद्यकीय व्यावसायिकास या अवयवांखेरीज मूत्राशय, मूत्रवाहिनी, मलाशय व गुदद्वार यांचा आणि स्तनांचाही अभ्यास करणे आवश्यक ठरते. 

पौगंडावस्था ( वयात येणे ), ऋतुचक्राचा प्रारंभ, प्रत्येक ऋतु-चक्रातील निरनिराळ्या अवस्था, गर्भधारणा, प्रसूती व ऋतुनिवृत्ती या प्रसंगी जननेंद्रियात बदल होत असतात. हे बदल व्यवस्थितपणे घडून यावेत आणि त्या काळात स्त्रीला कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टीने स्त्रीरोगतज्ञ उपचार करतात व सल्ला देतात. [ जनन तंत्र].

नैसर्गिकपणे नियमित आणि फारसा त्रास न होता चालणार्‍या जननें-द्रियांच्या कार्यातील दोष अनेक प्रकारचे असू शकतात. त्यांपैकी ऋतु-चक्रातील दोष, वंध्यत्व आणि प्रसूतीशी संबंधित अडचणी यांचा विचार अनुक्रमे ऋतुस्राव व ऋतुविकार , वंध्यत्व आणि प्रसूतिविज्ञान या मराठी विश्वकोशा तील स्वतंत्र नोंदींमध्ये केलेला आहे. 

इतर दोषांची संक्षिप्त माहिती येथे दिली आहे. या सर्व दोषांच्या निदानासाठी स्त्रीच्या ऋतुप्राप्तीपासूनची मासिक पाळीची माहिती, प्रसूतीसंबंधीचा इतिहास, जननेंद्रियांची बाहेरून व आतून तपासणी या गोष्टी नित्याच्या असतात. 

याशिवाय आवश्यकतेनुसार योनिमार्गात घालण्याच्या उपकरणाने अंतर्दर्शन, श्राव्यातीत प्रतिमादर्शन, क्ष-किरण चित्रण, अंतर्दर्शक ( दुर्बिण ) वापरून उदरगुहेचे निरीक्षण, गर्भाशयाचे निरीक्षण, ऊतकाचा नमुना ( गर्भशय्येचा म्हणजेच गर्भाशयाच्या आतील अस्तराचा नमुना ) घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शन, रक्तातील अंतःस्रावाचे मापन यांसारख्या चाचण्या केल्या जातात.

चनेतील उपजत दोष :

भ्रूणात दहाव्या ते बाराव्या आठवड्यांत आढळणार्‍या मुलेरियन वाहिनीद्वयांपासून जननेंद्रियांची निर्मिती होत असते हे दोन कोशिकासमुदाय ( डावा व उजवा ) एकत्र येऊन आणि त्यात पोकळी निर्माण होऊन योनिमार्गाचा वरचा तीनचतुर्थांश भाग, गर्भाशयाची ग्रीवा, गर्भाशय व दोन अंडवाहिन्या अशी खालून वर निर्मिती घडते. या प्रक्रियेतील विलंबामुळे जन्माच्या वेळी काही दोष आढळतात

उदा., अल्पविकसित स्थितीमुळे प्रौढ स्त्रीमध्ये सर्व जननेंद्रिये बाल्यावस्थेतील किंवा पौगंडावस्थेतील आकाराचीच राहून गर्भाशय पुढे झुकलेला असणे किंवा मुलेरियन वाहिनीत पोकळी निर्माण न झाल्यामुळे जननमार्ग एखाद्या रज्जूसारखा भरीव असणे किंवा हीच अच्छिद्रतेची स्थिती ( संकोचता ) अंडवाहिनीपुरती मर्यादित राहिल्याने वंध्यत्व असणे. 

कधीकधी योनि-मुखावरील जाड पडद्याचे आवरण टिकून राहून त्यामुळे तो मार्ग बंद राहतो आणि ऋतुस्रावातील रक्त व इतर ऊतक बाहेर न पडता साचू लागते. योनिमार्ग व गर्भाशय फुगून अस्वस्थता जाणवते.

मुलेरियन वाहिनी एकमेकींशी जोडण्याची क्रिया अपूर्ण राहिल्यास त्यांची स्वतंत्रपणे वाढ होऊ शकते. परिणामतः दोन गर्भाशय निर्माण होतात किंवा एकाच गर्भाशयात उभा पडदा होऊन त्याचे दोन भाग पडतात. असा पडदा पूर्ण किंवा वरच्या भागापुरता मर्यादित असतो. यांपैकी एका गर्भाशयात गर्भधारणा होऊ शकते. 

 जननेंद्रिये पूर्णपणे अविकसित राहण्याची स्थिती क्वचितच उद्भवते. तशी असल्यास त्यासोबत मूत्र-मार्गाचेही दोष आढळतात. योनिमार्गाचा सर्वात खालचा भाग आणि गुदद्वार यांच्या विकासात अडथळा आल्यास कधीकधी मलाशयाची जोडणी योनिमार्गाशी होऊन गुदद्वार मात्र छिद्रहीन राहते.

संपूर्ण अविकसित जननेंद्रियाचा अपवाद सोडल्यास बाकी सर्व उपजत दोष शस्त्रक्रियेने बरे होऊ शकतात.


Image result for स्त्री रोग विज्ञान




संक्रामणजन्य विकार :

 स्त्रीच्या जनन तंत्राची अनेक संक्रामणे लैंगिक संबंधांतून उद्भवलेली असतात. उपदंश ( गरमी ) आणि परमा ( गोनोरिक ) या दोन संक्रामणांचे प्रमाण प्रतिजैविके, आरोग्य-विषयक शिक्षण व कंडोमचा वापर यांमुळे गेल्या ५० वर्षांत खूप कमी झाले आहे. 

अन्यथा उपदंशामुळे योनिमार्गावर लाल कठीण फोड येणे ( रतिव्रण ), साधारण चार आठवड्यांनी लहानलहान पीटिका दिसणे, मातेपासून नवजात बालकास उपजत विकारामुळे त्याची वाढ खुंटणे इ. समस्या निर्माण होत असत. 

परमा संक्रामणामुळे ग्रीवा, बार्थोलिन ग्रंथी, मूत्रमार्ग यांचा दाह, विद्रधी, पू निर्माण होऊन मूत्रात तो आढळणे, वंध्यत्व, नवजात अर्भकात डोळ्यांमधील संक्रामण अशा तक्रारी असत. या दोन्ही रोगांची काही वर्षांनी आढळणारी सार्वदेहिक लक्षणेही आता फारशी आढळत नाहीत.

लैंगिक संबंधातून होणार्‍या इतर संक्रामणांमध्ये जघन कणार्बुद, लसीका कणार्बुदी वंक्षण रोग व मृदु रतिव्रण या तीन प्रकारांचा समावेश होतो. पहिला प्रकार क्लोबसिएल्ला वर्गातील जंतूंमुळे होतो. जांघेमध्ये मोठी गाठ येऊन तिचे रूपांतर विद्रधीमध्ये होते. दुसर्‍या प्रकारास कोशिकांतर्गत वाढणारे क्लॅमिडीया वर्गाचे लहान जंतू कारणीभूत असतात. 

बाह्य जननेंद्रियांवर फोड किंवा विद्रधी निर्माण होऊन त्यामुळे जांघेतील अनेक लसीका ग्रंथी खोलवरच्या तसेच त्वचेखालील - सुजून वेदना-दायक होतात. त्या फुटून व्रणही होण्याची शक्यता असते. आसपासच्या भागात संक्रामण पसरू शकते. तिसर्‍या प्रकारात हीमोफायलस दुक्रेयी सूक्ष्मजंतू मृदू आणि वेदनादायक विद्रधी निर्माण करतात. बाह्य जननेंद्रियावर ते आढळतात. [ गुप्तरोग].

विषाणुजन्य विकारातील एचआयव्ही ( HIV ) विषाणूंमुळे एड्स लैंगिक संबंधातून होत असला तरी त्याची जननेंद्रियात लक्षणे आढळतनाहीत [ रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग ]. इतर लक्षणेही फार उशिरा दिसतात. रक्ताच्या परीक्षणातूनच त्याचे निदान होऊ शकते. परिसर्पचा सामान्य प्रकार लैंगिक संबंधातून जननेंद्रियांवर आक्रमण करण्याची शक्यता असली तरी इतरत्र प्राथमिक संक्रामणही होऊ शकते. 


चामखीळ निर्माण करणारा विषाणू लैंगिक संबंधातून स्त्रीच्या जनन-मार्गात प्रवेश करू शकतो. या विषाणूच्या संक्रामणानंतर काही काळाने जननेंद्रियावर बारीक फोड निर्माण होऊ शकतात. कधीकधी हे संक्रामण पूर्णपणे लक्षणविरहित असू शकते; परंतु त्याचा संबंध नंतर निर्माण होणार्‍या ग्रीवेच्या कर्करोगाशी असू शकतो. यासाठी वयात आलेल्या सर्व स्त्रियांना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम आता काही देशांमध्ये राबविली जात आहे.