Monday, January 4, 2016

कोष्ठसंबद्ध अपत्यपथ स्तन मेंढ्र : (शिश्न).मुष्कवृषण; अंड; अंडकोश)उरःकोष्ठस्थहृदय फुफ्फुस कलाशारीर

स्ती हे सर्व मूत्रविकारांचे अधिष्ठान व मूत्राचे आधारस्थान आहे. त्याचे तोंड खाली असून सिरा-स्नायू यांनी वेष्टिलेल्या अत्यंत पातळ त्वचेचा हा अवयव आहे. मूत्रवाही नाड्या (गविनी) बस्तीला वरच्या भागी उजवीकडे व डावीकडे येऊन मिळतात. बस्तीच्या अधोभागी मूत्रप्रसेक नावाचे छिद्र असते. बस्तीचे तोंड खाली असून त्यात येणाऱ्या मूत्रवह नाडीमध्ये हजारो सूक्ष्म स्रोतसांतून एकसारख्या पाझरणाऱ्या मूत्ररूप द्रवाने तो भरतो. त्याच सूक्ष्म स्रोतसांनी दुष्ट वातादी दोषसुद्धा बस्तीत प्रवेश करून आघात करतात व प्रमेह निर्माण करतात. स्वस्थानात विलीन झालेले शुक्र तेथून चलित होऊन शुक्रवाही स्रोतसांनी स्रवून बस्तीमध्ये भरले जाऊन मूत्रप्रसेक करणाऱ्या स्रोतसाने बाहेर जाते.

नाभी, पाठ, कंबर, अंड, गुद, वृषण, शिश्न या चार बाजूंना असलेल्या अवयवांच्या बरोबर मध्यावर ओटीपोटात ‘मूत्राशय’ असतो. पुरुषांत बस्तीच्या मागे दोन्ही बाजूंना शुक्रवहस्रोतस व डावीकडे गुद असते. स्त्रीशरीरात गुद व बस्ती यांमध्ये गर्भाशय असतो. बस्ती हा सुषिर स्नायुमय असून, रक्त व कफधातूच्या प्रसादरूप घटकांनी तो बनतो. त्यावर मार लागला, तर वायू, मूत्र, पुरीष यांचा अवरोध होतो.

कोष्ठसंबद्ध पण बाहेरील बाजूस असणारे अवयव : स्त्रीशरीरात अपत्यपथ व स्तन आणि पुरुषशरीरात मेंढ्र व वृषण हे या प्रकारात मोडतात.

पत्यपथ : अपत्यपथ म्हणजे योनी किंवा स्त्रीचे गुह्यांग. भगोष्ठापासून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागास अपत्यपथ म्हणतात. मूत्रद्वाराच्या खाली अपत्यपथाचे बाह्यमुख असते. भगोष्ठावर रोम असतात. अपत्यपथातून मासिक पाळीच्या वेळी रजाचे उत्सर्जन होते. यात चार पेशी असतात.

स्तन : छपन्न प्रत्यंगांपैकी एक. स्तन दोन असतात. स्त्री व पुरुष दोघांच्याही उरोभागावर पर्शुकांच्या बाहेर मांसात त्वचेखाली स्तन असतात. स्तन हे बाहेर तोंड असलेले एक स्रोतस आहे. स्त्रियांचे स्तन बारा वर्षांनंतर शुक्रप्रादुर्भावाच्या वेळी यौवनात पुष्ट व मोठे होतात. पुरुषांचे होत नाहीत. गर्भधारणा झाल्यावर ते अधिक मोठे होतात. प्रसूतीनंतर तिसऱ्या दिवसानंतर स्तन्ययुक्त होतात. स्तन्य म्हणजे दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी व स्तन्य स्तनचुचुकाकडे नेणाऱ्या दोन धमन्या स्तनामध्ये असतात. प्रत्येक स्तनात पाच पेशी असतात. त्यांनी स्तन पुष्ट होतात. रसवह सिरा स्तनांकडे रस घेऊन येतात. रसापासून स्तन्याची उत्पत्ती होते व अपत्य प्रेमामुळे स्तन्याची प्रवृत्ती होते. स्तन हे शुक्रवहस्रोतसाचे मूळ आहे.

स्तनरोहित व स्तनमूळ ही दोन्ही मर्मे स्तनप्रदेशाच्या भागात असतात. गर्भिणी व बाळंतिणीचे स्तन हे दुग्धयुक्त असतात. स्तनाच्या पुढे आलेल्या निमुळत्या टोकास स्तनचुचुक किंवा पिपालक म्हणतात. मातेच्या आहाररसाने गर्भावस्थेत गर्भाचे पोषण होते. त्यास सात्म्य झालेल्या रसापासून स्तन्य म्हणजे दूध निर्माण होते. हे स्तन्य बालकाची पुष्टी व वृद्धी करते. त्यामुळे बालकाची प्रतिकारशक्ती वाढते.

मेंढ्र : (शिश्न). शरीराबाहेर मूत्र व शूक्र सोडण्याचा पुरुषदेहातील मार्ग. हे कर्मेंद्रिय पुरुषांत भगास्थीच्या खाली साधारण सहा अंगुळे लांब व पाच अंगुळे घेराचे असते. मान व हृदय यांना बांधून असणाऱ्या ज्या कंडरा खाली जातात, त्यापासून शिश्नची उत्पत्ती होते. शिश्नाच्या ठिकाणी एक पेशी व एक कूर्चा आहे. शिश्नाखाली एक शिवण गुदापर्यंत जाते. ह्या शिवणीच्या ठिकाणी शस्त्रकर्म करू नये. मूत्रवह व शुक्रवह स्रोतसांचे शिश्न हे बहिर्द्वार आहे. शिश्नात मूत्रवहन करणाऱ्या दोन व शुक्रवहन करणाऱ्या दोन धमन्या आहेत. लघवी अडली किंवा रोखून धरली तर शिश्नात वेदना होतात.

मुष्क : (वृषण; अंड; अंडकोश). पुरुषशरीरामधील एक अवयव. पुरुषांच्या मेंढ्राच्या खालील सुपारीच्या आकाराच्या दोन ग्रंथींना वृषण किंवा मुष्क म्हणतात शुक्रवहस्रोतसाचे मूळ वृषणामध्ये असते. शुक्रवहन करणारी नाडी वृषणाच्या खालच्या टोकापासून वर कटीमध्ये जाते व बस्तीच्या पार्श्वभागाने मेंढ्रात येते. हे सहा अंगुळ लांब व आठ अंगुळ परिघाचे असतात.

र्व शरीरव्यापिनी शुक्रधराकला शुक्रोत्पत्ती करते. वृषण हे मांस, रक्त, कफ आणि मेद यांचा सारभूत घटकांनी उत्पन्न होते. शुक्रवहस्रोतसाच्या छेदामुळे षंढत्व तसेच मरणही येऊ शकते. शुक्राचा अवरोध, अतिमैथुन, क्षार व अग्नी यांमुळे शुक्रवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यात दोन पेशी आहेत.

रःकोष्ठस्थ अवयव : यात हृदय व फुफ्फुस यांचा समावेश होतो.

हृदय : उरःस्थानातील अवयव. हा दोन्ही स्तनांच्या मध्ये उरःस्थानात थोडा डावीकडे, आमाशयाच्या तोंडाशी असतो. हृदयाच्या खाली डावीकडे आमाशय, प्लीहा व उजवीकडे यकृत आहे. खाली तोंड असलेल्या मिटलेल्या पुंडरिक कमळाप्रमाणे त्याचा आकार असतो. कफ व रक्ताच्या साररूप अंशापासून हृदय बनते. हे विशेषत्वाने चेतनेचे-ज्ञानाचे-स्थान असून मनाचे अधिष्ठान आहे. गर्भावस्थेत चौथ्या महिन्यात हृदयाची अभिव्यक्ती होते. हृदय हे रसवह व प्राणवह स्रोतसांचे मूळ व व्यानवायूचे स्थान आहे. तसेच ओजाचे सर्वांत श्रेष्ठ स्थान आहे. हृदयातून रसधातू व्यानवायूद्वारे सर्व धमन्यांमध्ये फेकला जातो व सिरांवाटे तो पुन्हा हृदयामध्ये परत येतो. हृदय हे प्राणाचे स्थान आहे. प्राणवायू हृदयाचे धारण करतो. उरःस्थानातील अवलंबक कफ अन्नाच्या व स्वतःच्या वीर्यामुळे हृदयाचे धारण करतो. हृदय हे सद्यप्राणहर मर्म तसेच सिरामर्म आहे. त्यात मंडलाकार संधी असतात.

फुफ्फुस : हृदयाच्या नाडींना सलग्न असा उरःस्थानातील अवयव. हा फासळ्यांच्या आत असतो. रक्ताचा फेस व वात यांपासून फुफ्फुसाची उत्पत्ती होते. फुफ्फुस हा उदानवायूचा आधार आहे. उजवे व डावे असे त्याचे दोन भाग आहेत. ही दोन्ही फुफ्फुसे प्राणवह किंवा श्वसननाडीने जोडलेली आहेत. डाव्या फुफ्फुसाने हृदयाचा बराच भाग झाकला जातो. प्रत्येक फुफ्फुसात दोन पेशी असतात.

लाशारीर : कला म्हणजे धातू धारण करणाऱ्या अवयवांची अंतःत्वचा व तिच्यात धातू निर्माण करणारे घटक. धात्वाशयाचे स्नायू हे कलांना बाहेरून व जरायूसारखी म्हणजे गर्भ वेष्टनासारखी अंतःत्वचा आतून झाकते. प्रत्येक धातूच्या आशयामधील अंतरामध्ये कलांची व्याप्ती असते. धातूच्या आशयाने जो द्रवांश राहतो, तो स्वतः त्या धातूच्या अग्नीने परिपक्व होतो व हा रसाचा शिल्लक भाग अत्यंत अल्प असतो. म्हणून त्याला कला म्हणतात. प्रत्येक दोन कला भागांत कफ असल्याने प्रत्येक कला भाग कफवेष्टित असतो. कला ह्या सात आहेत.

(१) मांसधरा कला : या कलेत मांस असून त्यात सिरा, स्नायू, धमनी व स्रोतसे यांची बारीक प्रताने पसरलेली असतात. (२) रक्तधरा कला : ही मांसधातूच्या आत राहून रक्त उत्पन्न व धारण करते. ती विशेषतः यकृत, प्लीहा, सिरा व मांस यांत आतून आच्छादलेली असते. (३) मेदोधरा कला : ही सर्व प्राण्यांच्या पोटात व सर्व लहान हाडांत रक्तासह असते. तीच कवटीने झालेल्या पोकळीत मस्तिष्क, मस्तुल्लुंग (मेंदू) या नावाने असते व मोठ्या हाडाच्या पोकळीत मज्जा म्हणून असते. (४) श्लेष्मधरा कला : ही शरीराच्या सर्व सांध्यांमध्ये राहून कफ निर्माण व धारण करणारी कला आहे. या कफाच्या लेपनामुळे सांध्यांचे चलनवलन नीट रीतीने होते. तिने निर्माण केलेल्या कफाने सर्व संधींचे दोन्ही अस्थिघटक एकमेकांना जोडलेले राहून बळकट होतात. (५) पुरीषधरा कला : ही मलधरा कला होय. ही अन्तकोष्ठात म्हणजे पक्वाशयाच्या भागात असते. अन्नरसाचे पचन व पृथक्करण होऊन निर्माण होणाऱ्या घट्ट मलभागाची ही आधारभूत कला आहे. उंडुकाच्या ठिकाणी राहून मलधरा कला ही अन्नापासून मल वेगळा करण्याचे कार्य करते. (६) पित्तधरा कला : ही कला पित्ताशय असते. ती आमाशयातून पक्वाशयाकडे जाणारे आणि गिळलेले, चावून खाल्लेले, प्यायलेले व चाटून खाल्लेले असे चारही प्रकारचे अन्न आपल्या शक्तीने तेथे धारण करून योग्य त्या अवधीत पित्ताच्या तेजाने शोषून अन्नाचे पचन करते. (७) शुक्रधरा कला : शुक्रधातू हा मानवदेहामध्ये अदृश्य रूपात असतो व तो सर्व शरीर व्यापून असतो. शुक्रवहस्रोतसाचे मूळ स्तन आणि वृषणामध्ये असते. बाल्यावस्थेत शरीरामध्ये शुक्रधातू अव्यक्त स्वरूपात असतो व यौवनात येऊ लागल्यावर तो व्यक्त होऊ लागतो.

No comments:

Post a Comment