| ||||
4 New Superheavy Elements Land on Periodic Table Four new elements will join more than a hundred others on the periodic table of the elements, the International Union of Pure and Applied Chemistry (IUPAC) announced last week. IUPAC has now initiated the process of formalizing names and symbols for these elements," Jan Reedijk, president of the Inorganic Chemistry Division of IUPAC, said in a statement. Right now, the new elements have placeholder names and symbols that denote the elements' atomic numbers. Read More »What 2016 Holds for the Mysterious World of Physics Read More » Local Geology Makes Sunday's Earthquake in India Complex Read More » Unusual Case of Brain Disease Found in Former College Football Player A young man who played football in college and suffered many concussions had already developed a degenerative disease of the brain that is usually seen in older people by the time he died at age 25 from a heart problem, according to a new report of his case. The brain disease, called chronic traumatic encephalopathy (CTE), occurs in people who have experienced repetitive trauma to the brain, and can only be diagnosed by autopsy, the researchers said. The man's case was unusual because widespread signs of CTE in the brain are rare in people of this age, although smaller signs that the disease is developing have been seen in people as young as 17, the researchers said in their report. Read More »Archaeologists Return to Neanderthal Cave as ISIS Pushed from Iraq Read More » Digging Up Dinosaurs: 5 Trends That Will Be Bigger Than T. Rex Read More » Strong Social Connections Linked to Better Health Eating healthy food and exercising play important roles in health and well-being, but if you are feeling lonely, you may also want to consider reaching out: A lack of social connection may have a negative impact on your physical health, new research suggests. For example, older people ages 57 to 91 who felt socially isolated had more than double the risk of high blood pressure as those who didn't feel isolated, the researchers found. Moreover, adolescents and teens ages 12 to 18 who felt socially isolated had a 27 percent increased risk of inflammation, compared with those who did not feel socially isolated, the researchers found. Read More »New Stick-On Device Could Monitor Heart Problems An ultrathin and stretchable device that sticks to your skin like a sticker could one day be used to monitor your heart rate, according to a new report. The researchers who designed the device say it could be used by patients who need to have their heart rates monitored continuously, such as those who suffer from heart problems like arrhythmia (abnormal heart rhythms), or who have a greater risk of a heart attack. Moreover, the device could be useful for people who are have an increased risk of cardiovascular disease, because it could measure how fast the heart goes back to its resting rate after exercise, which is an important indicator of cardiovascular health, the researchers said. Read More »New Oregon Law Allows Pharmacists to Prescribe Birth Control Pills Women in Oregon no longer need a doctor's prescription to get birth control pills, according to a new state law. Instead, they can fill out a health questionnaire and receive oral contraceptives from a licensed pharmacist. The law removes barriers to birth control — typically, women get a prescription during an annual checkup, which costs both time and money, said Dr. Jill Rabin, co-chief in the division of ambulatory care, Women's Health Programs at Northwell Health in New Hyde Park, New York. Read More » | ||||
| ||||
|
Tuesday, January 5, 2016
FeedaMail: Science News Headlines - Yahoo! News
Monday, January 4, 2016
Frutarom invests in algae startup for food, cosmetic products
Direct Imaging: The Next Big Step in the Hunt for Exoplanets
Read More »
Tiny Chameleons' Tongues Pack a Powerful Punch
Read More »
Tough, 3D-Printed Ceramics Could Help Build Hypersonic Planes
Read More »
Gorgeous Images Reveal Parasitic Plant in 3-Way Symbiotic Relationship
Read More »
Brain Circuit Linked to Depression Found in Rats
The brain circuits responsible for the inability to feel pleasure have now been discovered in rats, a finding that could help researchers better understand the mechanisms underlying depression and schizophrenia. Previous brain-imaging research suggested that anhedonia might be linked to a part of the brain that sits just behind the forehead known as the medial prefrontal cortex. Now, scientists have conducted experiments on the medial prefrontal cortex of rats. Read More »
Tip for Keeping New Year's Resolutions: Turn Them into Questions
If you normally have trouble sticking to your New Year's resolutions, a new study may help: Psychologists have found that asking questions and then answering them, instead of making statements, is one key to sticking with your promises. The studies were looking into this effect of asking questions in a variety of contexts, such as eating healthier or going out to vote. In most of the studies, the participants were questioned by another person, and only had to answer the question, said Eric Spangenberg, co-author on the paper and professor of marketing and psychology at the University of California, Irvine. Read More »
Frutarom invests in algae startup for food, cosmetic products
One of the world's largest flavoring and specialty natural ingredient companies is investing in algae to enhance its food and cosmetic products. Frutarom Industries said on Monday it bought half of a biotech startup called Algalo, which is based on a kibbutz, or communal farm, in northern Israel, that developed a way to efficiently cultivate, harvest and process a variety of algae. The algae yield strong antioxidants, lipids and proteins that can help cardiovascular and immune systems, as well as bone structure, Israel-based Frutarom said. Read More » | ||
प्रसवोत्तर शारीरिक बदल, परिचर्येचे उद्देश, प्रसवोत्तर परिचर्या
प्रसवोत्तर परिचर्या :
After Delivery Care For Mother In India |

प्रसवोत्तर काळात म्हणजे प्रसूतीनंतर वार व गर्भकोशाचा सर्व भाग गर्भाशयातून बाहेर पडल्यापासून सहा आठवड्यांच्या काळात, प्रसूत स्त्रीची जी काळजीपूर्वक देखभाल करण्यात येते तिला प्रसवोत्तर परिचर्या म्हणतात. ⇨ प्रसवपूर्व परिचर्येएवढीच किंबहुना थोडी अधिक महत्त्वाचीच ही परिचर्या असते, कारण गर्भारपण व प्रसूती या अवस्थांतच मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांच्या एकूण संख्येपेक्षा अधिक स्त्रिया प्रसवोत्तर काळात मरण पावतात, असे आढळले आहे. अपसामान्य गर्भारपण व कष्टप्रसूती या दोन्हींमधून उद्भवणारे दुष्परिणाम प्रसवोत्तर काळात गंभीर परिणाम करतात.
प्रसवोत्तर
परिचर्येचा मुख्य उद्देश बाळंतिणीस तिची गर्भावस्थेपूर्वीची प्रकृती
पुन्हा प्राप्त होण्यास मदत करण्याचा असतो. निरोगी गर्भारपण व सुखप्रसूती
यानंतरचा प्रसवोत्तर काळ सर्वसाधारणपणे व्यत्ययाशिवाय पार पडतो. काही
स्त्रिया या काळात मनोविकारवश बनतात. जननक्रिया पूर्ण झाल्यानंतरची ती
मानसिक प्रतिक्रिया असू शकते. स्थिर व्यक्तिमत्त्वाची स्त्री पूर्वावस्थेत
जेवढी सहज येऊ शकते तेवढी अस्थिर व्यक्तिमत्त्वाची भावनाविवश स्त्री येत
नाही. कारण तिच्या आयुष्यातील पहिले बाळंतपण ही एक महत्त्वाची घटना असते.
प्रत्येक बाळंतिणीस या काळात विश्वासात घेऊन समजूतदारपणाने व ममतेने
वागविण्याची गरज असते.
Body / Baby Care After Delivery |
प्रसवोत्तर शारीरिक बदल : प्रसवोत्तर
परिचर्येची तत्त्वे समजण्याकरिता प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रसवोत्तर काळात
होणाऱ्या शारीरिक बदलांसंबंधी थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे.
जननेंद्रियांच्या परागामी बदलांना ‘निवर्तन’ किंवा ‘प्रत्यावर्तन’ म्हणतात. गर्भाशयातील या बदलांना ‘गर्भाशय निवर्तन’ म्हणतात.
या बदलांचा हेतू अवयवांची अवस्था गर्भारपणापूर्वीप्रमाणे करण्याचा असतो.
प्रसूतीनंतर ताबडतोब गर्भाशयाचे आकारमान १५ सेंमी. लांब, १२ सेंमी. रुंद, ४·५ सेंमी. जाड वरच्या भागात व १ सेंमी. जाड खालच्या भागात असतो व त्याचे वजन १,००० ग्रॅ. असते. गर्भाशय निर्वतन पहिल्या आठवड्यात जलद होते व त्याचे वजन आठवड्याच्या शेवटी ५०० ग्रॅ. भरते. त्यानंतर आकारमान व वजन हळूहळू कमी होत जाऊन सहाव्या आठवड्याच्या शेवटास वजन ६० ग्रॅ. भरते. प्रसूतीनंतर लगेच गर्भाशयाची ग्रीवा (मानेसारखा भाग) मऊ, ठेचाळलेल्यासारखी व सुजलेली असते. केवळ दोनच दिवसांत ती पूर्ववत होते. पहिल्या दहा दिवसांपर्यंत ग्रीवानालात दोन बोटे शिरू शकतात; परंतु
दुसऱ्या आठवड्यात शेवटी एकच बोट शिरू शकते. योनिमार्ग पूर्ववत होण्यास तीन
आठवडे आणि श्रोणिस्नायूंचा (धडाच्या तळाशी हाडांनी अवेष्टित असलेल्या
खोलगट भागातील स्नायूंचा) तान (प्राकृतिक जोम व ताण) पूर्ववत होण्यास सहा
आठवडे लागतात.
| How To Take Care Of Your Body After Giving Birth |
प्रसवोत्तर काळात योनिमार्गातून येणाऱ्या, रक्त व गर्भशय्या भागाच्या मृत ऊतकमिश्रित (पेशीसमूहमिश्रित) स्रावाला ‘सूतिस्राव’ म्हणतात. पहिले तीन-चार दिवस हा स्राव रक्त व क्लथित (साखळलेल्या) रक्ताच्या गोळ्यांचा बनलेला असून लाल रंगाचा असतो. याला ‘लाल सूतिस्राव’ म्हणतात.
दुसऱ्या आठवड्यात या स्रावाचा रंग करडा ते पिवळा होतो व त्यात
प्रामुख्याने द्रवीभवन झालेले रक्त आणि श्वेतकोशिका (पांढऱ्या पेशी) असतात.
याला ‘पीत सूतिस्राव’ म्हणतात. तिसऱ्या आठवड्यात स्राव पांढरा व गढूळ बनतो आणि त्यात श्वेतकोशिका व श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) असतो. याला ‘श्वेत सूतिस्राव’ म्हणतात.
सूतिस्राव क्षारधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण तयार होण्याचा
गुणधर्म असलेला) असून त्याला विशिष्ट गंध असतो. प्रसूतीनंतर पहिले दोन-तीन
दिवस गर्भाशयाची पोकळी निर्जंतुक असते; परंतु त्यानंतर योनिमार्गातील सूक्ष्मजंतू वर प्रवेश करतात व ते सूतिस्रावाच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीत दिसतात.
प्रसवोत्तर काळात पहिले दोन-तीन दिवस स्तनाग्रातून घट्ट पिवळसर स्राव येतो. त्याला ‘प्रथमस्तन्य’ म्हणतात. त्यानंतर दुग्धस्रवणास सुरुवात होते. या सुमारास स्तन भरून येतात, टणक
बनतात व ताणलेल्या त्वचेखाली निळ्या नीला स्पष्ट दिसतात. हे रक्ताधिक्य
बहुप्रसवेपेक्षा प्रथमप्रसवेत अधिक असते. बहुप्रसवेचे दुग्धस्रवण
प्रथमप्रसवेपेक्षा लवकर सुरू होते. [⟶ दुग्धस्रवण व स्तनपान ].
Post Delivery Care In Ayurveda |
परिचर्येचे उद्देश : प्रसवोत्तर परिचर्येचे तीन उद्देश असतात : (१) बाळंतिणीस तिची पूर्वीची निरोगी प्रकृती मिळवून देणे, (२) सूक्ष्मजंतू-संक्रमणास विरोध करून ⇨प्रसूति-पूतिज्वरासारख्या
विकारांना प्रतिबंध करणे आणि (३) स्तनपानास योग्य परिस्थिती निर्माण करून
अर्भक संगोपनाविषयी सूचना देणे. वरील उद्दिष्टांशिवाय आधुनिक काळात
राष्ट्रीय गरज बनलेल्या ⇨ कुटुंबनियोजनाविषयी माहिती देणे याच वेळी हितावह ठरेल. संततिनियमनाच्या साधनांच्या माहितीशिवाय दोन मुलांमधील अंतर कमीतकमी तीन वषे असावे, हेही पटवून द्यावयास हवे.
काळजी व देखभाल : प्रसवोत्तर काळात पुढील गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागते.
(१) विश्रांती : पहिला दिवस बाळंतिणीने अंथरूणात पडून पूर्ण विश्रांती घ्यावी. दुसऱ्या दिवसापासून दैनंदिन विधी करावयास हरकत
नसावी. बाळंतीण जेवढी लवकर चलनक्षम होईल तेवढा नीला अंतर्कीलनाचा (रक्ताची
गुठळी किंवा इतर काही बाह्य पदार्थ नीलेमध्ये अडकून तेथील रक्तप्रवाह बंद
पडण्याचा) धोका कमी होतो. सूतिकागृहातून सुखप्रसूती झालेल्या स्त्रियांना
२–५ दिवसांत घरी पाठवतात. बाळंतिणीला रात्रीची झोप उत्तम हवी. जरूर तेव्हा
एखादे शामक औषध द्यावे. दुपारच्या जेवणानंतर दोन तास पूर्ण विश्रांती
घ्यावी.
(२) आहार : पहिल्या दिवशी आहारात हलके अन्न असावे. दुसऱ्या दिवसापासून पूर्ण भोजन करावे. त्यात जरूर ती जीवनसत्त्वे, खनिजे वगैरे पदार्थ तर असावेतच, पण शिवाय दुग्धस्रवणाकरिता ७०० कॅलरी अधिक ऊर्जा मिळेल असा आहार असावा. [⟶ पोषण].
Postpartum Care For Mom |
(३) औषध-योजना
: सूतिस्राव प्रमाणापेक्षा जास्त असल्यासच हल्ली अरगटासारखे औषध (मेथरजिन
गोळ्यांच्या स्वरूपात) देतात. पूर्वी प्रत्येक बाळंतिणीस हे औषध देत; परंतु
सुखप्रसूतीनंतर त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे आढळले आहे. प्रसवोत्तर
काळात विरेचकांचा योग्य वापर करून मलविसर्जन नियमित होण्याकडे लक्ष द्यावे.
मिल्क ऑफ मॅग्नेशिया ४–६ चहाचे चमचे (१६ ते २४ मिलि.) भरून घेतल्यास
उपयुक्त असते. रक्तक्षयावर इलाजाकरिता किंवा प्रतिबंधात्मक उपचार म्हणून
तोंडाने २०० मिग्रॅ. फेरस सल्फेट (गोळ्या, पाक वगैरे स्वरूपात) दररोज द्यावे. रक्तदाब तपासून वाढलेला आढळल्यास योग्य इलाज सुरू करावेत.
(४) सर्वसाधारण देखभाल : यामध्ये सूक्ष्मजंतु-संक्रमणाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय, तसेच ते उद्भवल्यास लवकर ओळखण्याचे मार्ग यांचा तसेच पुढील गोष्टींचा समावेश होतो : (अ) नाडी, श्वसनक्रिया
व तापमान यांची दिवसातून दोनदा नोंद करणे. (आ) गर्भाशय निवर्तनाची रोज
मापे घेऊन नोंद करणे. (इ) सूतिस्राव प्रकाराची नोंद ठेवणे. (ई) स्तनांची
काळजी घेण्यास शिकविणे [⟶ स्तन]. (उ) विटपाच्या (स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियांच्या अवतीभोवती असलेल्या भागाच्या) स्वच्छतेविषयी, विशेषेकरून
योनिमार्ग व गुदद्वार यांसंबंधी काळजी घेणे. (ऊ) बाळंतिणीने बसून मुलास
पाजावे. दिवसातून थोडा वेळ पालथे पडावे. योग्य तो व्यायाम करावा. (ए) सहा
आठवडेपर्यंत संभोग करू नये.


For Mother | Meaning
शारीरिक तपासणी : प्रसवोत्तर
काळात बाळंतिणीची दोन वेळा संपूर्ण शारीरिक तपासणी करणे इष्ट असते. पहिली
तपासणी सूतिकागृहातून घरी जाण्यापूर्वी व दुसरी सहा आठवड्यांनंतर करावी.
बाळंतीण जर लवकर घरी जाणार असेल (दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी), तर
योनिमार्गाची (आत बोटे घालून) तपासणी करू नये. मात्र सर्व विटप भाग तपासून
पहावा. दोन्ही तपासण्यांच्या वेळी नवजात अर्भकाचीही संपूर्ण तपासणी करावी व
योग्य त्या सूचना, विशेषेकरून स्तनपानासंबंधी सूचना, कराव्यात.
उपद्रव : प्रसवोत्तर काळात काळजी घेतली न गेल्यास पुढील संभाव्य उपद्रवांची शक्यता असते : (१) प्रसवोत्तर पूतिता [⟶ प्रसूति-पूतिज्वर].
(२) प्रसवोत्तर दुय्यम रक्तस्राव (वारेचा किंवा गर्भकोशाचा तुकडा आत राहून
गेल्यामुळे व इतर कारणांनी गर्भाशयातून होणारा रक्तस्राव). (३) आंशिक निवर्तन (नेहमीप्रमाणे गर्भाशयाचा आकार कमी न होता काहीसा मोठा राहणे), (४) श्रोणिगुहेतील अंतस्त्याचे स्खलन (गर्भाशय किंवा मूत्राशय नेहमीच्या जागा सोडून खाली सरकणे), (५) पश्चनत गर्भाशय (गर्भाशयाचे नेहमीपेक्षा मागील बाजूकडे झुकणे), (६) स्तनांचे सूक्ष्मजंतु-संक्रामण व स्तनपानासंबंधी अडचणी, (७) चिरकारी पाठदुखी, (८) नवजात अर्भकातील विकृती व संभाव्य मृत्यू.
संदर्भ : 1. Dawn, C. S. Textbook of Obstetrics, Calcutta, 1974.
2. Masani, K. M.; Parikh, M. N. A Textbook of Obstetrics, Bombay, 1976.
| आनुवंशिक रोग क्या है | ट्रिक | माहिती | क्या | इंग्लिश | Translate English | आनुवंशिक विकार और रोग
आनुवंशिक रोग क्या है | ट्रिक | माहिती | क्या | इंग्लिश | Translate English | आनुवंशिक विकार और रोग

वंशावळी पाहून पुढच्या पिढीतील आनुवंशिक रोगाबद्दल काही भविष्य वर्तविता येईल काय? याचे उत्तर आनुवंशिक गुणोत्तर पाहून देणे शक्य आहे. खाली दिलेल्या दोन उदाहरणांवरून याची कल्पना येईल. ही उदाहरणे माणसात तुरळकपणे आढळणाऱ्या विकृतींची आहेत.
(१) अलिंगसूत्रावरील प्रभावी जनुकांचे अपेक्षित प्रमाण : आई (*) किंवा बाप (*) यापैकी एक विषमरंदुकी असल्यास त्यांच्या मुलांतील निम्मी निरोगी व निम्मी असून त्यांचे प्रमाण १ : १ असते. याऐवजी दोघे (आईबाप) रोगी व विषमरंदुकी असल्यास चौघा मुलांपैकी तिघांत तो रोग दिसतो; प्रमाण ३ : १ असते. (२) अलिंगसूत्रातील जनुके अप्रभावी असल्यास :
आई व बाप दोघेही विषमरंदुकी व रोगवाहक असून रोगाची प्रकट लक्षणे दर्शवीत नाहीत; त्यांच्या संकरातून झालेल्या संततीत चौघांपैकी एक समरंदुकी असून रोगाची लक्षणे दर्शवितो. दोघे विषमरंदुकी फक्त रोगवाहक व एक समरंदुकी व निरोगी होईल. रोग्यांचे निरोग्यांशी प्रमाण १ : ३असेल.
रंगसूत्र-विकृती : जनुकांच्या उत्परिवर्तनाने (यास कण-उत्परिवर्तन म्हणतात) रंगसूत्राचा थोडा भाग बदलतो. अनेकदा हे उत्परिवर्तन रंगसूत्रांच्या मोठ्या भागाचे, तर कधी संपूर्ण रंगसूत्राचे होते. अशावेळी आनुवंशिकतेत बिघाड होतो. ड्रॉसोफिला नावाच्या फलमाशीच्या लाला-ग्रंथीत मोठ्या आकाराची रंगसूत्रे असून ती प्रयोगास सोयीची असतात.
अशा रंगसूत्राचा १/१००० भाग जरी कमी केला तरी त्याचा परिणाम दिसून येतो. मनुष्याती रंगसूत्राच्या १/१० भागाच्या बदलाचा परिणाम फक्त ओळखता येतो. इतर प्राण्यांत १/५ भाग कमी झाला तर जगणे अशक्य होते.
आ. १६. डाऊन सिंड्रोम.
फलनानंतर काही गर्भकोशिकातील एकूण रंगसूत्रांची सख्या द्विगुणित अधिक एक (२ एन
+ १) व काहीतील
आ. १५. रोगानुहरण (दोघे विषमरंदुकी असल्यास).
द्विगुणित वजा एक (२ एन -१) होते; यांपैकी पहिल्या प्रकारापासून बनणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक कोशिकेत एक रंगसूत्र जास्त झाल्याने तिला त्रिसमसूत्री म्हणतात व ती व्यक्ती शरीरविकृती दर्शविते.
मनुष्याच्या बाबतीत अलिंगसूत्र त्रिसमसूत्री व्यक्तीच्या रंगसूत्राच्या सूत्रसमूहचित्रात २१ व्या जोडीत हे जादा रंगसूत्र बहुधा आढळते. यामुळे झालेल्या शरीरविकृतीस मंगोलॉइड वेडेपण किंवा डाऊन सिंड्रोम (लक्षणसमूह) म्हणतात. मंगोली लोकांप्रमाणे पापण्यांवरील सुरकुत्या अशा व्यक्तीत आढळल्याने या विकृतीस ते नाव दिले आहे.
तथापि त्याशिवाय खुजेपणा, थोटेपणा, तळहातावरच्या रेषांतील वैचित्र्य, काही उपजत व्यंगे (विशेषतः हृदयासंबंधी), मनोदौर्बल्य इ. रोगलक्षणे आढळतात. ट्रायसोमी ई सिंड्रोम, ट्रायसोमी डी सिंड्रोम किंवा पॅटोज सिंड्रोम या नावाच्या विकृतीही आढळतात. दुसऱ्या प्रकारच्या (एक रंगसूत्र कमी असणाऱ्या) गर्भकोशिकेपासून बनणाऱ्या व्यक्तीस (एकूण रंगसूत्रे ४५ = २ एन - १) एकसमसूत्री म्हणतात.
आ. १७. क्लाइनफेल्टर सिंड्रोम.
लिंगसूत्रांच्या संख्येत फरक पडूनही विकृती होतात. अशा व्यक्ती त्यांच्या अनित्य लैंगिक बाह्य लक्षणांवरून ओळखू येतात. उदा., द्विलिंगी व्यक्ती (हिजडा) व क्लाइनफेल्टर सिंड्रोम; यांमध्ये लिंगसूत्रे नेहमीच्या एक्सवायऐवजी एक्सएक्सवाय किंवा एक्सएक्सएक्सवाय (म्हणजे एकूण ४६ ऐवजी ४७ किंवा ४८ रंगसूत्रे) असतात. या दोन्हीत बाह्यावयव पुरुषासारखे पण काही लक्षणे स्त्रियांसारखी असतात.
टर्नर सिंड्रोम या विकृतीची व्यक्ती स्त्रीच असते परंतु स्तन, अंडाशय, गर्भाशय इ. अवयवांचा विकास फारच कमी असून छाती पुरुषाप्रमाणे असते; खुजेपणा, मान, कान इत्यादींतही अनित्यता आढळते;या व्यक्तींच्या शरीरकोशिकांत वाय लिंगसूत्र नसते; एकूण रंगसूत्रे ४५ असून लिंगसूत्रांना एक्सओ (xo)म्हणतात.
सुपरफीमेल सिंड्रोममध्ये तीन एक्स लिंगसूत्रे व कोशिकेत एकूण ४७ रंगसूत्रे असतात. रंगसूत्रातील स्थानांतरण नावाच्या प्रक्रियेमुळेही व्यक्तीच्या शरीरात विकृती आढळतात. यामध्ये एका अलिंग रंगसूत्राचा काही भाग दुसऱ्याला जोडला जातो;
उदा., १५ किंवा २२ या जोडीतील एखादे रंगसूत्र अधिक लांबलेले दिसते. २१ व्या रंगसूत्राचा काही भाग १५ व्याला किंवा २२ व्याला जोडला जातो व त्यामुळे ते लांब दिसतात; यास १५/२१ किंवा २२/२१ रंगसूत्र म्हणतात. यामुळेही वर उल्लेखिलेले मंगोलॉइड वेडेपण येते.
एका
पिढीतून दुसरीत उतरताना जनुकांमध्ये बहुधा काही बदल होत नसला तरी क्वचित
उत्परिवर्तने होतात. परंतु त्यांची पुनरावृत्ती ५०,००० पिढ्यांतून एकदाच
होते. मनुष्यात
आ. १८. टर्नर सिंड्रोम
त्यांचे
प्रमाणदहा हजार ते लाखात एक असते. हे कशामुळे घडून येते ते अद्याप गूढच
आहे.
अंतरिक्षातून येथवर पोचणाऱ्या आयनीकारक प्रारणामुळे ते होत असावे असा एक तर्क आहे. मानवनिर्मित प्रारणाने (उदा., क्ष-किरण, अणूबाँब किंवा ऊष्मीय-अणुकेंद्रीय बाँब यांच्या द्वारे निर्माण होणारा किरणोत्सर्ग वगैरे) घडून येणे शक्य आहे, त्यामुळे या सर्वांची भयानकता प्रकर्षाने जाणवते.
उत्परिवर्तन बहुधा विकृतिजनकच असते. रक्तकोशिकांतील हीमोग्लोबिन ए जाऊन हीमोग्लोबिन एस त्यात भरले जाते; यामुळे दात्र-कोशिका पांडुरोग व असा प्रकारच्या आणखी अनेक विकृती निर्माण होतात. अशा प्रकारचे पिढ्यानपिढ्यातील उत्परिवर्तनाचे अस्तित्व त्यांच्यापासून होणाऱ्या फायद्यातोट्यावर अवलंबून असते.
बदलत्या परिस्थितीत प्रथम अयोग्य वाटणारी जनुके पुढे उपयुक्त ठरून अव्याहतपणे चालू राहतात व त्यास नैसर्गिक निवड म्हणतात. आईबापांचे वय जास्त होत जाईल तसे त्यांच्या जनुकातील उत्परिवर्तनाचे प्रमाण अधिक होते. त्यातील कित्येकांमुळे शारीरिक संरचनेत विकृती निर्माण होतात.
या प्रकारच्या प्रभावी जनुकामुळे उपास्थिअविकसन, बृहदांत्राचा (मोठ्या आतड्याचा) आनुवंशिक मोड, ð गाऊट, हंटिंग्टन कोरिया (मेंदूचा एक रोग) वगैरे विकृती व अप्रभावी जनुकामुळे अग्निपिंडाची तंतुपुटी विकृती, फिनिल कीटोनमेह वगैरे विकृती होतात. वृक्कग्रंथीमुळे झालेला उदकमेह (बहुमूत्रता) रोग लिंगसूत्रातील जनुकउत्परिवर्तनामुळे होतो. मधुमेह, जठरव्रण किंवा ग्रहणीव्रण (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागातील व्रण), संधिवात, मनोदौर्बल्य, वेड व फेफऱ्याचे काही प्रकार यांची आनुवंशिक प्रवृत्ती असते.
काही जन्मजात व्यंगांचा उगम आनुवंशिकतेत असतो,तर काहींचा गर्भावस्थेतील परिस्थितीत असतो. सर्व विकृती आनुवंशिक नसतात तशा त्या सर्व संपादितही नसतात. कधी दोन्हींचे मिश्रण कारणीभूत असते. जन्मजात बहिरेपणा, खंडित पार्श्वतालू, तुटका ओठ, जठरनिर्गमी संकोच व श्रोणिसंधीचा (नितंब अस्थीचा सांधा) स्थानभ्रंश ह्या पाच नेहमी आढळणाऱ्या जन्मजात व्यंगांसंबंधी आनुवंशिक प्रवृत्ती दिसते.
अंतरिक्षातून येथवर पोचणाऱ्या आयनीकारक प्रारणामुळे ते होत असावे असा एक तर्क आहे. मानवनिर्मित प्रारणाने (उदा., क्ष-किरण, अणूबाँब किंवा ऊष्मीय-अणुकेंद्रीय बाँब यांच्या द्वारे निर्माण होणारा किरणोत्सर्ग वगैरे) घडून येणे शक्य आहे, त्यामुळे या सर्वांची भयानकता प्रकर्षाने जाणवते.
उत्परिवर्तन बहुधा विकृतिजनकच असते. रक्तकोशिकांतील हीमोग्लोबिन ए जाऊन हीमोग्लोबिन एस त्यात भरले जाते; यामुळे दात्र-कोशिका पांडुरोग व असा प्रकारच्या आणखी अनेक विकृती निर्माण होतात. अशा प्रकारचे पिढ्यानपिढ्यातील उत्परिवर्तनाचे अस्तित्व त्यांच्यापासून होणाऱ्या फायद्यातोट्यावर अवलंबून असते.
बदलत्या परिस्थितीत प्रथम अयोग्य वाटणारी जनुके पुढे उपयुक्त ठरून अव्याहतपणे चालू राहतात व त्यास नैसर्गिक निवड म्हणतात. आईबापांचे वय जास्त होत जाईल तसे त्यांच्या जनुकातील उत्परिवर्तनाचे प्रमाण अधिक होते. त्यातील कित्येकांमुळे शारीरिक संरचनेत विकृती निर्माण होतात.
या प्रकारच्या प्रभावी जनुकामुळे उपास्थिअविकसन, बृहदांत्राचा (मोठ्या आतड्याचा) आनुवंशिक मोड, ð गाऊट, हंटिंग्टन कोरिया (मेंदूचा एक रोग) वगैरे विकृती व अप्रभावी जनुकामुळे अग्निपिंडाची तंतुपुटी विकृती, फिनिल कीटोनमेह वगैरे विकृती होतात. वृक्कग्रंथीमुळे झालेला उदकमेह (बहुमूत्रता) रोग लिंगसूत्रातील जनुकउत्परिवर्तनामुळे होतो. मधुमेह, जठरव्रण किंवा ग्रहणीव्रण (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागातील व्रण), संधिवात, मनोदौर्बल्य, वेड व फेफऱ्याचे काही प्रकार यांची आनुवंशिक प्रवृत्ती असते.
काही जन्मजात व्यंगांचा उगम आनुवंशिकतेत असतो,तर काहींचा गर्भावस्थेतील परिस्थितीत असतो. सर्व विकृती आनुवंशिक नसतात तशा त्या सर्व संपादितही नसतात. कधी दोन्हींचे मिश्रण कारणीभूत असते. जन्मजात बहिरेपणा, खंडित पार्श्वतालू, तुटका ओठ, जठरनिर्गमी संकोच व श्रोणिसंधीचा (नितंब अस्थीचा सांधा) स्थानभ्रंश ह्या पाच नेहमी आढळणाऱ्या जन्मजात व्यंगांसंबंधी आनुवंशिक प्रवृत्ती दिसते.
Subscribe to:
Posts (Atom)