Showing posts with label खंडौष्ठ. Show all posts
Showing posts with label खंडौष्ठ. Show all posts

Monday, January 4, 2016

स्तनपानाच्या अती स्तनपान दुग्धस्रवण हाताने स्तनमर्दन

  | माँ के दूध में प्रतिरक्षी का नाम    |  मां के दूध में कौनसा प्रतिरक्षी पाया जाता है    | 

Image result for अती स्तनपान


हिले घट्ट अन्न म्हणून चेचून मऊ केलेले केळ देणे उत्तम. कारण हे फळ उत्तम पिकलेले व सहज उपलब्ध होणार असते. तांदूळ, मका, गहू यांपासून दुधात शिजवून तयार केलेली साखर घातलेली पेज, दुधातून अंड्याचा पिवळा बलक, शिजवून ठेचून, मऊ केलेल्या भाज्या, उकडून ठेचून मऊ कलेले बटाटे इ. पदार्थ सुरुवातीस देता येतात. टोमॅटोचा रस किंवा संत्र्यासारख्या फळांचा रस पूरक अन्न म्हणून १५ दिवसांच्या अर्भकासही देता येतो. स्तनपानातही काही अडचणींचा संभव असतो.

पूर्ण स्तनपान : सर्वसाधारणपणे प्रत्येक स्तनपानाच्या वेळी अर्भकास किती दूध मिळाले हे मोजता येत नाही. अर्भकात पुढील लक्षणे आढळल्यास अपूर्ण स्तनपान होत असावे. स्तनपानाच्या दोन वेळांमध्ये अतिशय रडणे, बद्धकोष्ठ, वजन न वाढणे व अधूनमधून उलट्या होणे, रात्री रडणे व कमी झोप लागणे. स्तनपानाने मुलाचे पोट भरले किंवा नाही हे ओळखण्याकरिता स्तनपानापूर्वी आणि नंतर अर्भकाचे वजन करून नोंद ठेवता येते. अपूर्ण स्तनपान होत असल्यास वरचे दूध पूरक अन्न म्हणून द्यावे.

अती स्तनपान : ज्या स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर एक आठवड्यानंतर दुग्धोत्पादन सुरू होते त्यांचे स्तन बहुधा नेहमी दुधाने भरपूर भरलेले राहतात. त्यामुळे अर्भक अधिक काळपर्यंत स्तनपान करीत राहूनही स्तन रिकामे होत नाहीत व अर्भक जादा दूध पिते. यामुळे उलट्या व जुलाब होतात; परंतु अर्भकाचे वजन घटत नाही. याबाबतीत स्तनपान देण्याची एखादी पाळी टाळणे, दूध स्तनातून काढून टाकणे वगैरे उपाय उपयुक्त ठरतात.

दुग्धस्तंभित स्तन आणि स्तन विद्रधी : स्तन दुधाने अती भरलेले असले म्हणजे स्तनपान वेदनोत्पादक होण्याचा संभव असतो. स्तनपानापूर्वी व नंतर दूध हाताने सहज काढून टाकता येण्यासारखे असल्यास काढून टाकावे. त्यांना योग्य तेवढा आधार देणे, ते स्वच्छ ठेवणे व जरूर पडल्यास स्टिल्बेस्ट्रॉलसारखी औषधे देऊन दुग्धोत्पादन कमी करणे इ. इलाज उपयुक्त असतात.

 माँ के दूध से शिशु को सबसे महत्वपूर्ण पदार्थ क्या मिलता है    |  

स्पर्शासह्यत्व असणाऱ्या दुग्धस्तंभित स्तनाच्या बोंडीवर अर्भकाच्या चावण्यामुळे इजा झाल्यास, स्तनाग्रे स्वच्छ न ठेवल्यास स्तन विद्रधी (गळू) होण्याचा संभव असतो. स्तनाग्रांची काळजी घेणे व शक्यतो दूध स्तनात साठू न देणे या उपायांनी विद्रधी होण्याचे टाळण्यास मदत होते. त्याकरिता ‘स्तन पंप’ नावाचे उपकरण त्रास न होता दूध काढून टाकण्याकरिता वापरतात. रबरी फुगा व काचनळीचे हे उपकरण स्तनातून दूध चोषून घेते काच नळीवरील गोल फुगवट्यात दूध साठले म्हणजे ते सहज काढून घेता येते. हा फुगवटा नेहमी दूध त्यातच वाहील असाच स्तनावर पंप बसविताना असावा. हे उपकरण बऱ्याच वेळा वापरावयाचे असल्यास ते नेहमी स्वच्छ व निर्जंतुक ठेवणे महत्त्वाचे असते.

आ. २. स्तन पंप : (१) रबरी फुगा, (२) काच नळी, (३) फुगवटा.
स्तनपान केव्हा देऊ नये : 




काही वेळा दुग्धस्त्रवणास प्रारंभच होत नाही. कलकत्त्यातील एका पाहणीत १८% सुखवस्तू स्त्रियांमध्ये दुग्धस्रवणास प्रारंभच न झाल्याचे आढळले होते. मातेला मधुमेह, सक्रिय (लक्षणे स्पष्ट असलेल्या व रोगक्रिया चालू असलेल्या अवस्थेतील) क्षयरोग, देवी किंवा प्रसूतीनंतर होणारा चित्तभ्रम यासांरख्या विकृती असल्यास स्तनपान देऊ नये. फुप्फुसशोध (फुप्फुसांची दाहयुक्त सूज), विषमज्वर, प्रसूतिपश्च जंतुरक्तता (सूक्ष्मजंतूंचा रक्तात प्रवेश होऊन ते रक्तपरिवहनांबरोबर सर्व शरीरात पसरणे), पटकी यांसारख्या रोगांत माता अतिशय अशक्त बनत असल्याने स्तनपान देण्यास असमर्थ असते. 

बच्चे को माँ का दूध कब तक पिलाना चाहिए    |  

जोराचा रक्तक्षय, अपस्मार (फेफरे), हृदयरोग व चिरकारी (दीर्घकालीन) मूत्रपिंडशोध हे रोग असल्यास तंज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय स्तनपान देऊ नये. 

स्तन विद्रधी, बोंडीवरील भेगा किंवा स्तनाग्र नेहमीपेक्षा आत दबलेल्या स्थितीत असल्यास स्तनपान देऊ नये. अकाल प्रसवाचे अर्भक (गर्भारपणाचे दिवस पूर्ण होण्यापूर्वीच काही महिने अगोदर जन्मलेले मूल) स्तनपान करण्यास असमर्थ असते. जन्मजात हृद्‌रोग, ⇨ खंडौष्ठ आणि ⇨ खंडतालू असणारी मुलेही स्तनपान करू शकत नाहीत. वरील कारणांपैकी काहींमध्ये विशेषेकरून आर्थिक हलाखीची स्थिती असल्यास मातेच्या स्तनातील दुधाचा उपयोग कसा करता येईल याचा संपूर्ण विचार करणे जरूरीचे असते.

बच्चे को मां का दूध कितने साल तक पिलाना चाहिए    |  

मातेने सेवन केलेली काही औषधे तिच्या दुधातून उत्सर्जित होतात. कुष्ठरोगी माता त्या रोगावरील डॅप्सोन नावाचे औषध सेवन करीत असल्यास तिच्या नवजात अर्भकास स्तनदुग्धाद्वारे आपोआप मिळणारे हे औषध काही महिने रोगांविरुद्ध संरक्षण देण्यास मदत करते. याउलट काही औषधे अर्भकास हानिकारक असतात. 

तंबाखू (विडी, सिगारेट ओढणे किंवा पानातून अथवा चुना लावून तशीच तंबाखू खाणे), आर्सेनिक असलेली औषधे, बार्बिच्युरेटे (अपस्माराकरिता सतत घ्यावी लागणारी औषधे), आयोडाइडे, पारायुक्त औषधे, अफु, सल्फा यांसारखी मातेच्या दुधातून उत्सर्जित होणारी औषधे अर्भकास हानिकारक असल्यामुळे ती घेण्यापूर्वी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणे जरूरीचे असते.

माँ के दूध में प्रतिरक्षी का नाम क्या है    |  

दुग्धस्रवण काळात घ्यावयाची काळजी : गर्भारणपासूनच स्तनांची काळजी घेण्यास सुरुवात करणे हितावह असते. स्तनांच्या बोंड्या दबलेल्या असल्यास शेवटच्या तीन महिन्यांपासून काच किंवा प्लॅस्टिकच्या गोल विशिष्ट आकाराच्या (तव्याच्या आकराच्या) व मध्ये भोक असलेल्या तबकड्या स्तनाग्रे त्या भोकातून बाहेर येतील अशा प्रकारे स्तनावर बांधण्याकरिता योग्य काचोळ्या वापराव्यात. 

हाताच्या बोटांनी अशी स्तनाग्रे अधूनमधून ओढून बाहेर काढण्याचाही प्रयत्न करता येतो. दुग्धनलिका खुल्या राहाव्यात म्हणून हलक्या हाताने स्तनमर्दन करावे व गर्भारपणाच्या शेवटास थोडा स्त्राव (प्रथमस्तन्य) मुद्दाम दाबून बाहेर काढावा. प्रत्येक स्तनपानापूर्वी व नंतर निर्जंतुक केलेल्या पाण्याने बोंड्या स्वच्छ कराव्यात. 

लेटकर दूध पिलाने के नुकसान    |  

यामुळे अर्भकाच्या मुखात जंतुवाढ होत नाही व त्यास अतिसारादी जठरांत्र रोग होत नाहीत. दररोज अंघोळीच्या वेळी स्तन साबण व पाण्याने स्वच्छ करून कोरडे करावेत. जमल्यास योग्य मापाच्या व पुढूनच चटकन सैल करता येण्यासारख्या काचोळ्या स्तनपानकालात वापराव्यात.

कृत्रिम दुग्धपान : कृत्रिम दुग्धपानाचे ‘पूरक’ आणि ‘अनुपूरक’ असे दोन भाग करता येतात. ज्या वेळी स्तनातील दुधाचा पुरवठा अपुरा पडतो त्या वेळी वरचे म्हणजे गायीचे व म्हशीचे दूध द्यावे लागते, यालाच ‘पूरक दुग्धपान’ म्हणतात. परंतु काही कारणामुळे मातेचे स्तनपान देणे बंद करावे लागते किंवा माताच मृत झाल्यास अर्भक संपूर्ण बाहेरच्याच दुधावर वाढवावे लागते, यालाच ‘अनुपूरक दुग्धपान’ म्हणतात.

नवजात शिशु को कितनी बार दूध पिलाना चाहिए

कृत्रिम दुग्धपानाचे काही प्रकार पुढीप्रमाणे आहेत : (१) गायीचे ताजे दूध,  (२) म्हशीचे ताजे दूध, (३) बाजारी तयार दूध भुकटी (पावडर), (४) संघनित (कंडेन्स्ड) दूध.